Skip to main content

बुरशी : काल, आज आणि उद्या

 बुरशी : काल, आज आणि उद्या

(Fungi : Yesterday, Today and Tomorrow)

पृथ्वीवर शेती सुरू झाली तेव्हापासून बुरशी वेगवेगळ्या कारणांकरिता वापरली जात आहे. प्रामुख्याने बुरशी शेतात पडलेल्या पालापाचोळ्यावर वाढते आणि कित्येक उपयुक्त पदार्थ झाडांना पुरविते. आजकाल तर जैविक खतांमध्ये मायकोऱ्हायझा, ट्रायकोडर्मा ह्यांचा वापर प्रामुख्याने होतो.

अनेक वर्षे माणसाने बुरशीचा उपयोग पदार्थाचा स्वाद आणि रुचकरपणा वाढवण्याकरिता केला आहे. पूर्वेकडील जपान आणि अन्य देशांत मोनॅस्क्स, ॲस्परजिलस, ऱ्हायझोपस, न्यूरोस्पोरा  अशा बुरशींचा वापर अँगकाक, मिसो, सोयू, टेम्प या पदार्थांकरिता केला जातो.

दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीत सैनिकांना देण्यात  येणाऱ्या अन्नात बुरशीचा समावेश केला गेला. फ्युझॅरियम ओइडीयम, कॅंडीडा आणि ऱ्हायझोपस  या बुरशींचा वापर प्रथिनयुक्त आहारासाठी केला गेला.

याच कारणाने मक्यावर पडणाऱ्या स्मट नावाच्या बुरशीच्या रोगाला मेक्सिकन आहारात जागा मिळाली आहे. युस्टिलॅगो मेडीस  नावाची बुरशी मक्याच्या कणसांवर वाढते. मेक्सिकोमध्ये तिला हुईलाकोश असे म्हणतात. मक्यामध्ये असणाऱ्या पिष्टमय पदार्थांचे प्रमाण जरा कमी झाले; तरी हुईलाकोशमुळे प्रथिने खूपच वाढतात.

आळिंबी, भूछत्र, मशरूम अशा विविध नावांनी प्रचलित असलेली बुरशी जगभरात लोकांच्या आहारात स्थान प्राप्त करून आहे. प्रत्येक आळिंबीची पोषणमूल्ये वेगवेगळी आहेत. त्यामध्ये जीवनसत्त्वे (ब, क आणि ड) आणि धातूंचे (फॉस्फेटे, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सेलेनियम) प्रमाणही चांगले असते. काही आळिंबी पोषणमूल्यांबरोबरच त्यात असलेल्या औषधी गुणांमुळेही उपयुक्त ठरत आहेत. शरीरात रोग पसरविणारे सूक्ष्मजीवाणू व कर्करोग यांचा प्रतिबंध करणारी औषधे लेन्टिनस नावाच्या आळिंबीत तयार होतात. ह्याच आळिंबीचा उपयोग कोलेस्टेरॉल कमी करण्याकरितासुद्धा होतो. काही विषारी आळिंबी खाण्यास अयोग्य आहेत; पण त्यांना औषध प्रणालीमध्ये स्थान आहे. ॲमानिटा मस्कॅरिया  नावाची अतिशय सुंदर दिसणारी आळिंबी मेंदूच्या विकारांवर इलाज करण्याकरिता उपयोगी पडते. ॲमानिटा फ़्लॉइडिस  कॉलरा (पटकी) या रोगाला प्रतिबंध करू शकते.

आळिंबी जसे आहारात स्थान मिळवून आहे, तसे दुसऱ्या बुरशींना अद्याप स्थान मिळाले नाही. चीज तयार करताना वापरात येणारी पेनिसिलियम  ही बुरशी खूपच प्रसिद्ध आहे. आजकाल जगातील १६ देशांमध्ये फ्यूझॅरियम  ही बुरशी खाण्यामध्ये मान्यता पावलेली आहे. ॲस्परजिलस, फेनेरोकीट, पिकनोपोरस अशा बुरशी वेगवेगळी रसायने बनवितात. काही बुरशींपासून स्वाद निर्माण होतो. उदा., व्हॅनिला, रोझ, फ्रुटी अशा प्रकारचे स्वाद बुरशी तयार करते आणि त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. त्याचप्रमाणे द्राक्षांवर असणाऱ्या बुरशीचा (उदा., हॅन्सेनिओस्पोरा, पिचिया, झायगोअसकस, सॅकरोमायसिस ह्यांचा) उपयोग वैशिष्ट्यपूर्ण स्वादाची वाईन तयार करण्याकरिता होतो, तर सॅकरोमायसिस बोलारडाय  ही बुरशी प्रोबायॉटिक म्हणून उपयोगी पडते. दही लावण्याबरोबरच ह्या बुरशीचा उपयोग अतिसार कमी करण्याकरिता होतो. दुसऱ्या महायुद्धात बुरशीचा उपयोग प्रथिनाकरिता केला गेला. आज आळिंबीचा वापर आहारात केला जात आहे. उद्या अन्नाची गरज भागविण्यासाठी बुरशीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.           

जीवसृष्टीमध्ये बुरशीचे सु. ८१ हजार  प्रकार ज्ञात आहेत. शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर सु. ५१ लाख भिन्न स्वरूपांच्या आणि गुणधर्मांच्या बुरशी अस्तित्वात असून दरवर्षी त्यांत साधारण १५०० नवीन बुरशींची भर पडत असते.

बुरशींचे महत्त्व : बुरशीच्या अभ्यासाला सध्याच्या काळात दोन कारणांमुळे महत्त्व आलेले आहे. बुरशी प्रयोगशाळेत वाढवायला सोपी असते. त्यामुळे जवळजवळ ६०% पेक्षाही जास्त जैवतंत्रांतील क्रियांमध्ये  बुरशीचा वापर केला जातो. दुसरे कारण असे की, नवनवीन बुरशी माणसाला घातक ठरत असल्याने त्यांची वाढ रोखण्यासाठी प्रतिजैविके तयार करणे गरजेचे आहे.

द्विरूपी / बहुरूपी बुरशी : प्रत्येक जीवाच्या बाबतीत जन्म, वाढ आणि मृत्यू या तीन गोष्टी संभवितात. बुरशी मात्र बऱ्याच वेळा घातक परिस्थितीमध्ये तात्पुरते वेगळे रूप धारण करून टिकते. अशा काही बुरशी आहेत, की ज्या परिस्थितीतील बदलाबरोबर आपले  स्वरूप  बदलतात आणि परिस्थिती पूर्ववत झाल्यावर पुन्हा मूळ स्वरूप  धारण करू शकतात. अशा बहुरूपी बुरशींना द्विरूपी (Dimorphic) म्हणतात. उदा.,म्यूकर (Mucor) ही पावावर वाढणारी बुरशी कवकजाल स्वरूपात असते, परंतु वातावरणात प्राणवायू कमी असताना ती गोल कोशिकेच्या रूपात वाढते. अन्नातील साखरेच्या प्रमाणातील बदल अशा प्रकारची बुरशी घडवू शकते. माणसांमध्ये अशा बुरशीच्या रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो.

प्रतिकारशक्ती  कमी  असलेल्या  मनुष्यामध्ये काही बुरशी धोकादायक परिस्थिती निर्माण करतात. या बुरशी श्वासाबरोबर फुफ्फुसावाटे शरीरात प्रवेश करतात आणि रक्तप्रवाहातून शरीरभर पसरतात. हिस्टोप्लाझ्मा (Histoplasma), ब्लास्टोमायसेस (Blastomyces), कोक्सिडीओआडीस (Coccidiodes), या अशा प्रकारच्या द्विरूपी बुरशी आहेत.

कॅन्डिडा (Candida), म्यूकर (Mucor), ॲस्परजिलस (Aspergillus) या अतिशय धोकादायक बुरशी द्विरूपी व बहुरूपी अशा दोन्ही रूपांतही असतात. हिस्टोप्लाझ्मा बुरशी निसर्गामध्ये कवकजाल रूपात असते; ती जेव्हा मनुष्याच्या शरीरात प्रवेश करते तेव्हा (म्हणजे ३७0 से.तापमानाला) गोल कोशिकेचे रूप धारण करते आणि रक्तप्रवाहातून सहज मार्गक्रमण करते. कॅन्डिडा अल्बिकांस (Candida albicans) नावाची बुरशी मनुष्याच्या शरीरातच असते आणि जेव्हा रोगप्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा घातक ठरते. कर्करोगावर उपचार घेणारे रुग्ण, एड्सग्रस्त रुग्ण यांच्यात रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने कॅन्डिडायसीस (Candidiasis) नावाचा जीवघेणा रोग होतो. पावावर वाढणारी म्यूकर ही बुरशी एरव्ही निरुपद्रवी असते पण मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये ती घातक ठरू शकते. तिच्यामुळे म्यूकर मायकोसिस नावाचा रोग होतो. ॲस्परजिलस प्रजातीतील ॲ. फ्युमिगेटस, ॲ. फ्लावस, ॲ. नायजर या जातींमुळे पशुपक्षी व मनुष्य यांना ॲस्परजिलोसीस  नावाचा रोग होतो.

प्रतिजैविकांच्या शोधाचा उद्देश : बहुतेक बुरशी आत्मसंरक्षणासाठी आणि जोमाने वाढण्यासाठी आपले रूप बदलतात. कवकजालाचा उपयोग शरीरात प्रवेश करण्यासाठी  आणि गोल कोशिकेचे रूप रक्त प्रवाहातून सर्वत्र पसरण्यासाठी करतात. म्हणजेच बुरशीचे दुसरे रूप जास्त घातक असते. त्यामुळे, निरुपद्रवी रूपातून घातक रूपाकडे होणारा बदल रोखता आला तर रोगाचा प्रादुर्भावच होणार नाही. मनुष्याच्या शरीराचे तापमान हे बुरशीच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे अस्त्र आहे. या गोष्टीचा फायदा प्रतिजैविके शोधण्यासाठी शास्त्रज्ञ करीत आहेत.

बुरशीचा आकार आणि रुपांतर हे मुख्यत्वेकरून भित्तिकेमध्ये असलेल्या कर्बोदकांवर अवलंबून असते. ग्लुकान आणि मानान ही दोन्ही कर्बोदके बुरशीच्या भित्तिकेमध्ये असतात. भित्तिका तयार होताना प्रथम त्यांपासून  कायटीन या कर्बोदकाचा  सांगाडा तयार होतो. बाकीची कर्बोदके, प्रथिने आणि इतर रसायने तो सांगाडा भरून काढतात. जर सांगाडा तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करता आला तर भित्तिका तयार होणार नाही, किंवा तयार झाली तरी त्यात बाहेरच्या वातावरणापासून संरक्षण करण्याची ताकद असणार नाही. महत्त्वाचे म्हणजे कायटीन हे कर्बोदक मनुष्याच्या शरीरात तसेच वनस्पतींमध्ये तयार होत नाही. त्यामुळे कायटीन तयार होण्याची प्रक्रिया रोखणारी प्रतिजैविके माणसाला, तसेच पिकांना हानिकारक ठरत नाहीत.

बेन्जमिनिएला बुरशी : बुरशीतील बदल थांबविणे ज्या ज्या पद्धतीने शक्य आहे, त्या त्या गोष्टी तपासून पाहण्यासाठी काही कमी घातक बुरशी प्रतिकृती म्हणून वापरतात. उदा., बेन्जामिनिएला (Benjaminiella) ही बुरशी २८०  से. तापमानाला कवकजाल रूपात असते आणि ३७० तापमानाला गोल कोशिकेच्या रूपात असते. साखरेचे बदलते प्रमाणही तिच्यात बदल घडवू शकते. म्हणून माणसाला घातक नसणारी ही बुरशी अभ्यासासाठी नमुना (Model) म्हणून वापरता येते.

मानवास उपयुक्त द्विरूपी / बहुरूपी बुरशी : द्विरूपी किंवा बहुरूपी बुरशी वाईटच असतात असे नाही. ऑरिओबॅसिडियम (Aureobasidium) नावाची बुरशी कवकजाल रूपात सेल्युलोजवर वाढते तर कोशिकेच्या रूपात पुलुलान (Pullulan) नावाचे कर्बोदक तयार करते.फळांच्या संरक्षणासाठी पुलुलान वापरता येते. त्याचप्रमाणे सॅकॅरोमायसीस (Saccharomyces) ही बुरशी स्टार्च वापरताना कवकजाल रूपात असते तर कोशिकेच्या रूपात इथेनॉल तयार करते. यारोविया (Yarrowia) नावाची बुरशी खाऱ्या पाण्यातसुद्धा पेट्रोलियमचे प्रदूषण असलेल्या  ठिकाणी कवकजाल स्वरूपात जगते तर कोशिकेच्या रूपात असताना पेट्रोलियमचे विघटन करते.

बुरशीजन्य व्याधी (कवकसंसर्ग रोग; Fungal Disease)

मानवी जीवनाला उपकारक आणि अपायकारक अशा दोनही प्रकारच्या बुरशींचे सूक्ष्मजीव आपल्या सभोवताली वावरत असतात. आपल्या शरीराशी असणाऱ्या सततच्या संपर्काद्वारे ते व्याधी निर्माण करतात. बुरशीजन्य व्याधींमध्ये एक संसर्गजन्य (बुरशीबरोबरच्या प्रत्यक्ष संपर्कामुळे होणाऱ्या व्याधी; मायकोसीस/मायकोसेस; Mycosis/Mycoses), आणि दुसरी विषजन्य (बुरशीची वाढ झालेले पदार्थ खाण्यात आले आणि त्यातील बुरशीने तयार केलेले विषारी पदार्थ (मायकोटॉक्सिन; Mycotoxins) यामुळे होणाऱ्या व्याधी; मायकोटॉक्सिकोसीस/मायकोटॉक्सिकोसेस; Mycotoxicosis/Micotoxicoses) अशा दोन प्रकारच्या व्याधी आहेत.

१) संसर्गजन्य व्याधी : सामान्यपणे मानवी शरीर त्वचेच्या आवरणामुळे संरक्षित असते, परंतु सततच्या संपर्कामुळे काही प्रकारची बुरशी त्वचेवर वाढते. या बुरशीमध्ये असलेल्या केराटीनेज (keratinase) या विकरामुळे त्वचेतील केराटीन हे प्रथिन विघटन पावते. यामुळे होणाऱ्या व्याधी, त्वचेवर झालेल्या जखमामधून बुरशीचे बीजाणू (Spores) शरीरात जाऊन होणाऱ्या व्याधी, त्याचप्रमाणे श्वासावाटे बीजाणू शरीरात जाऊन निर्माण होणाऱ्या व्याधी. या व्याधी संसर्गजन्य असतात.

शरीराच्या कोणत्या भागात ही व्याधी होते, त्यानुसार त्यांना नावे दिली जातात. उदा., बाह्य त्वचेच्या व्याधी (गजकर्ण, नायटा, शिब, वगैरे). यांचा संसर्ग माणूस ते माणूस (Anthropophilic), प्राण्यांपासून (Zoophilic) आणि जमिनीपासून (Geophilic) अशा तीन  प्रकारे होऊ शकतो. या व्याधींमुळे शरीराच्या अवयवांवर पांढरे किंवा लालसर चट्टे उठतात, तेथे अतिशय खाज सुटते. याला टीनिया (Tinea) या नावाने संबोधतात. उदा., पायांवर (Tinea pedis), नखांवर (T. unguium), चेहेऱ्यावर (T.faciei), कपाळ आणि डोक्याच्या भागावर (T. capitis) इत्यादी. या बुरशीच्या केशकवक (ट्रायकोफायटॉन; Trichophyton), अधिचर्मक (एपिडर्मोफायटॉन; Epidermatophyton) आणि लघुबीजाणू (मायक्रोस्पोरियम; Microsporium) अशा तीन जाती आहेत.

अंतस्त्वचा विकार : बाह्य त्वचेला इजा पोहोचल्यास होणाऱ्या जखमेतून बुरशीची बीजाणू शरीरात जाऊन हे विकार निर्माण होतात. पण ही व्याधी अंतस्त्वचापुरतीच मर्यादित असते, पसरत नाही. ही बुरशी एरवी आपल्या भोवती शवोपजीवी मृतोपजीवी (Saprophyte) म्हणून वाढत असते. जखमेद्वारे ती अंतस्त्वचापर्यंत पोहोचून तिथे प्रस्थापित होते. त्या ठिकाणची त्वचा लालसर होऊन गाठीसारखी होते, त्या जागी पू तयार होतो आणि ती जखम वाहू लागते (Sporotrichosis). या विकारात अंतस्त्वचेच्या आत मोहोरीच्या आकाराचे आणि रंगाचे कण (Granules) तयार होतात. या कणांमध्ये ती बुरशी संरक्षित असते. उदा., स्पोरोट्रायकोसीस, मायसेटोमा (Mycetoma) इत्यादि.

अंतर्गत (आंतरप्रवाही) बुरशीजन्य व्याधी (Deep Mycosis, Systemic Mycosis) : बुरशीच्या या जातीसुद्धा सर्वसामान्य शवोपजीवीप्रमाणे निसर्गात वाढत असतात. प्रतिकार क्षमता कमी झालेल्या व्यक्तींमध्ये श्वसन, अन्ननलिका याद्वारे शरीरात प्रवेश करून त्या व्याधी निर्माण करतात. शरीराचे तापमान, प्रतिरोध संस्था यांच्याशी मुकाबला करून या बुरशी स्वतःला प्रस्थापित करतात. दुर्लक्ष केल्यास या व्याधी गंभीर रूप धारण करू शकतात. उदा., फुप्फुसांचा सिक्तकवक रोग/ॲस्पर्जिलस रोग (ॲस्पर्जिलोसीस; Aspergillosis), नाक, कान, सायनस यांचा म्यूकरमायकोसीस किंवा झायगोमायकोसीस.

२) विषजन्य व्याधी : घरातील साठविलेले खाद्य पदार्थ (मुरंबे, लोणची, पापड इ.) किंवा इतरही शिळे पदार्थ (पाव, चपाती इ.) यांवर बुरशीची वाढ होते. ही बुरशी अनेक प्रकारचे विषारी पदार्थ या पदार्थात सोडतात. असे पदार्थ खाल्ल्याने विषबाधा होते. बुरशीचा प्रादुर्भाव झालेली धान्ये, उदा., शेंगदाणे, बाजरी, ज्वारी, मका, इत्यादी पोटात गेल्यामुळेही विषबाधा होते. अनेक वेळा विषारी अळूम्बी खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे ऐकायला मिळते. अशा विषांचा अन्नसंस्थेवर आणि मेंदू व मज्जासंस्था यावर प्रामुख्याने परिणाम होतो. एल.एस.डी. सारखी मादकद्रव्ये अशा प्रकारच्या विषापासून तयार केली जातात. हे विष अरगट नावाच्या रोगकारक बुरशीमुळे धान्यात मिसळले जाते. ओट, बाजरी, ज्वारी यासारखी धान्ये, ज्यात अरगट बाधित दाणे (Grains) मिसळले जातात आणि त्यामुळे रोग होतात.

म्यूकरमायकोसीस (Mucormycosis)

मानवाची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे बुरशी माणसाच्या जीवाला धोका निर्माण करते. कर्करोग, पेशी कलम, निकृष्ट आहार, एचआयव्हीसारखे रोग, जैविक संयुगांचा (स्टेरॉइड्स) अति-वापर, मधुमेह ही रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची प्रमुख कारणे आहेत. जीवाला धोका सार्वदेहिक (Systemic; फुप्फुसावाटे प्रवेश करणाऱ्या) बुरशीमुळे जास्त असतो. कारण त्या रक्तप्रवाहातून शरीरभर पसरतात. कँडिडा, म्यूकर, ॲस्पर्जिलस या संधीसाधू द्विरूपी किंवा बहुरूपी (गोल कोशिका, कवकजाल आणि फसवे कवकजाल) बुरशी त्यामुळे जास्त धोकादायक आहेत, कारण रक्तप्रवाहातून त्या गोल कोशिकेच्या रूपात सहज मार्गक्रमण करू शकतात.

म्यूकरमायकोसीस किंवा झायगोमायकोसीस हा रोग बुरशीचा एक समूह प्रामुख्याने माणसात निर्माण करतो. जवळजवळ ७०-८० टक्के म्यूकरमायकोसीसची प्रकरणे ह्या अब्सिडिया, म्यूकर, ऱ्हायझोपस (Rhizopus) या बुरशींमुळे होतात, तर ऱ्हायझोम्यूकर (Rhizomucor), अपोफायसोमायसेस (Apophysomyces), कनिंगहामेला (Cunninghamella), ॲक्टिनोम्यूकर (Actinomucor), कोकेरोमायसेस (Cokeromyces), कोनिडीओबोलस (Conidiobolus) यांमुळे २०-३० टक्के प्रकरणे आढळतात. या बुरशी हवेपेक्षा मातीमध्ये, पालापाचोळा, प्राण्यांच्या विष्ठेमध्ये असतात. त्यामुळे या बुरशींचे बीजाणू बहुतेक लोक टाळू शकत नाहीत; पण तसा निरोगी माणसांना धोका कमी असतो. रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या माणसांमध्ये मात्र गंभीर आजार होण्याची शक्यता असते. म्यूकरमायकोसीसचे पाच वेगवेगळे प्रकार आहेत. १) ऱ्हायनोसेरेब्रल (Rhinocerebral) – प्रामुख्याने मधुमेह असणाऱ्यांना हा होतो. २) पल्मनरी – लुकेमिया (Pulmonary-leukaemia) असलेल्यांना धोका जास्त असतो. ३) जठरांत्रीय (गॅस्ट्रो इंटेस्टिनल; Gastrointestinal) – निकृष्ट आहार किंवा कोलायटीस असलेल्या रुग्णांना हा होऊ शकतो. ४) त्वचीय (क्युटेनियस; cutaneous) – त्वचेचे रोग असणाऱ्यांमध्ये म्यूकरसमूहाचा प्रादुर्भाव जास्त होतो. आणि शेवटचा प्रकार म्हणजे ५) फैलाव होणारा (डिसिमिनेटेड; disseminated) – पहिल्यांदा फुप्फुस आणि नंतर हृदय, मेंदू , डोळे, हाडे, किडनी असा पसरत जातो.

 सन २०२०-२०२१ मध्ये जगभर पसरलेल्या कोव्हिड-१९ या विषाणूच्या महामारीमुळे संसर्ग झालेल्या रोग्यांमध्ये सूक्ष्मजीवाणू किंवा बुरशीचा संसर्ग लगेचच होऊ शकतो. भारतात म्यूकरमायकोसीस, तसा कमी प्रमाणात आढळणारा रोग आहे. म्यूकर या बुरशी समूहाची मूळ प्रकृती ही पाणथळ, दमट जागा अशी असते. सर्व बुरशींचे कवकजाल हे पांढरेच असतात. कदाचित मेलॅनिन नावाच्या संयुगामुळे थोडेसे तपकिरी असू शकते आणि बीजाणू मात्र वेगवेगळ्या रंगाचे असतात आणि तीच त्यांची ओळख असते. ऱ्हायझोपस ही बुरशी, ‘ब्लॅक ब्रेड मोल्ड’ (Black Bread Mold) या नावानेही ओळखली जाते. ही बुरशी हवेतील दमटपणा जास्त झाला की वाढते. त्यामुळे रुग्णालयात जर प्राणवायूच्या नलिकेबरोबर असणारा आर्द्रकारी (ह्युमिडीफायर; Humidifier) स्वच्छ नसेल किंवा त्यातील पाणी बदललेले नसेल तर ती परिस्थिती म्यूकर समूहातील बुरशींना पोषक असते. ह्युमिडीफाय्ररमध्ये मेथिलीन ब्लू हे रंगद्रव्य टाकल्यास त्याचा बुरशी कमी करण्याकरिता उपयोग होतो.

 सुमारे पन्नास वर्षांहून जास्त काळ ॲम्फोटेरिसिन बी (amphotericin B)’ चा वापर घातक बुरशींची वाढ रोखण्यासाठी होत आहे. अर्गोस्टेरॉलचे (Ergosterol) संश्लेषण थांबविणे आणि त्यायोगे भित्तीकेच्या आतील पापुद्रयाला छिद्रे पाडणे हे प्रामुख्याने ॲम्फोटेरिसिन बी चे काम आहे. परंतु म्यूकरच्या समूहातील बुरशींवर त्याचा विशेष परिणाम होत नाही आणि त्यातून मानवी पेशींना ॲम्फोटेरिसिन बी जास्त विषारी (८ मायक्रोग्रॅम/मिली. इतक्या कमी प्रमाणात ९० टक्के हिमोलीसिस; Heamolysis; रक्तविलयन) असते. अशा घातक बुरशींचा नाश करण्याकरिता वेगवेगळी प्रतिजैविके शोधली जात आहेत. सध्या वापरात असणारी प्रतिजैविके, त्यांचे लक्ष्य आणि रुग्णांवर होणारे घातक परिणाम यांचा विचार करून नवीन लक्ष्य आणि कमी घातक प्रतिजैविकांवर सध्या जगात संशोधन सुरू आहे. बुरशीच्या भित्तिकेमध्ये असणारे कायटिन आणि त्याच्या संश्लेषणासाठी उपयोगी असणारे कायटिन सिंथेझ, ग्लुटामेट डिहायड्रोजनेझ ही विकरे अशी महत्त्वाची लक्ष्ये विचारात घेऊन प्रतिजैविके शोधण्याचे काम चालू आहे. याचा महत्त्वाचा फायदा असा की, कायटिन मानवी शरीरात नसते, त्यामुळे या लक्ष्याची प्रतिजैविउदा., निकोमायसीन) मानवाला विषारी असणार नाहीत. या करिता नमुना (मॉडेल) म्ह घातक नसणाऱ्या बेन्जामिनीएलासारख्या द्विरूपी बुरशींचा उपयोग केला जात आहे.


कुष्ठरोग (Leprosy)

इतिहास

कुष्ठरोग मुळात केव्हा आणि कोठे आढळला, याची माहिती इतिहासकारांना नाही. बायबलमध्ये ‘लेप्रसी’ हा शब्द आहे, मात्र तो वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचारोगांसाठी वापरला आहे. केवळ कुष्ठरोगासाठी नाही. कुष्ठरोगाचे अचूक विवेचन भारतीय वैद्य सुश्रुत यांच्या लेखात आढळते. इ.स.पू. यूरोपात कुष्ठरोगाचा प्रवेश झाला असे मानले जाते. काही इतिहासकारांच्या मते, पर्शियाचा राजा झेर्झेक्स याच्या सैन्याने जेव्हा इ.स.पू. चौथ्या शतकात ग्रीसमध्ये शिरकाव केला, तेव्हा त्यांच्यामुळे या रोगाचा प्रसार यूरोपात झाला असावा, असे मानतात.

इ. स. अकराव्या आणि बाराव्या शतकांमध्ये पश्चिम यूरोपात रोगाच्या साथी येत, त्याप्रमाणे कुष्ठरोगाच्या साथी आल्या. लोकांचे जीवनमान आणि आहार यांत सुधारणा झाल्यामुळे यूरोपमध्ये या रोगाचे प्रमाण कमी झाले. मात्र अठराव्या शतकापर्यंत नॉर्वेमध्ये हा रोग अस्तित्वात होता.

आज जगात सर्वत्र सु. ५० ते ६० लाख लोक कुष्ठरोगामुळे पिडीत आहेत. आफ्रिका, मध्य आणि दक्षिण अमेरिका, भारत आणि आग्नेय आशिया अशा उष्ण आणि उपोष्ण प्रदेशांत हे रुग्ण आढळतात. मात्र मागील काही दशकांत जगभर झालेल्या कुष्ठरोग निर्मूलन प्रयत्‍नांमुळे कुष्ठरोगाचे प्रमाण कमी होत आहे.

इ.स. १९५५ पासून कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम राबविले जातात. आता जागतिक आरोग्य संघटनेच्या साहाय्याने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन प्रकल्प राबविला जात आहे. शासकीय आणि अशासकीय संस्थांनी कुष्ठरोगासंबंधीची व त्याच्या उपचारक्षमतेबाबत समाजात जाणीव जागृत केली आहे. त्यामुळे समाजात कुष्ठरोगाबाबतची तिरस्कार व भेदभावाची भावना मोठ्या प्रमाणात घटली आहे.

एक दीर्घकालीन संसर्गजन्य रोग. या रोगामुळे प्रामुख्याने त्वचा, विशेषकरून नाकातील श्लेष्मल पटल तसेच मेरुरज्जू आणि स्नायूंना जोडणार्‍या चेता बाधित होतात. रोगाची तीव्रता वाढल्यास डोळे, यकृत, प्लीहा, स्नायू आणि अस्थिमज्जा यांवरही परिणाम होऊ शकतो. कुष्ठरोग हा प्राणघातक रोग नाही. या रोगावर वेळीच उपचार न केल्यास संसर्गामुळे बाधित व्यक्तीत शारीरिक व्यंग येऊन ती विकलांग होते. त्यामुळे कुष्ठरोगी हे भीती आणि गैरसमजुती यांचे बळी ठरतात. कुष्ठरोगबाधित रुग्णांना अनेकदा समाजाबाहेर टाकले जाते.

क्षयरोग आणि कुष्ठरोगाचे जीवाणू मायकोबॅक्टेरिएसी कुलातील आहेत. मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या दंडाकार जीवाणूंच्या संसर्गामुळे कुष्ठरोग होतो. इ.स. १८७३ मध्ये नॉर्वेतील वैद्य गेरहार्ट हेन्‍रिक आरमौअर हान्सेन यांना प्रथम ऊतींच्या नमुन्यात कुष्ठरोगाचे जीवाणू आढळले. या जीवाणूंमुळे कुष्ठरोग होतो, असे त्यांनी इ.स. १८७४ मध्ये सिद्ध केले. म्हणून या रोगाला हान्सेन रोग, तर या जीवाणूंना हान्सेन बॅसिलस असेही म्हणतात. मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूंचा संसर्ग प्रामुख्याने माणसात आढळतो; परंतु आर्मडिलो, चिंपँझी आणि मँगाबे या सस्तन प्राण्यांच्या शरीरात हे जीवाणू आढळले आहेत. हे जीवाणू कसे संक्रामित होतात, याचे कारण संशोधकांना समजलेले नाही. श्वसनमार्गातून या जीवाणूंचा संसर्ग होत असावा, असे बहुतांशी घटनांतून आढळले आहे; तर काही उदाहरणांतून त्वचेच्या संपर्कापासून ह्या रोगाचा संसर्ग होतो, असे दिसले आहे.

बहुतांशी लोक, मायक्रोबॅक्टिरियम लेप्री  हे जीवाणू, त्यांच्या संपर्कात आल्यास संसर्गाला प्रतिरोध करण्याची क्षमता असते आणि या संपर्कानंतर लोकांमध्ये प्रतिरोधक्षमता निर्माण होते. वास्तविक काही मोजक्या लोकांना कुष्ठरोग होतो. या जीवाणूंची वाढ खूप हळूहळू होते. यांचा परिपाक काळावधी १ ते ३० वर्षांचा असतो. संसर्ग झाल्यानंतर, साधारत: ३-५ वर्षांनी या रोगाची विशिष्ट लक्षणे दिसू लागतात.

प्रमुख लक्षणे

त्वचेवर पांढरा किंवा लाल चट्टा दिसतो, त्वचेची संवेदनक्षमता कमी होते आणि चेता जाड दिसतात. या रोगामुळे त्वचादेखील जाड होऊन शरीराच्या विविध भागांवर गाठी वाढलेल्या दिसून येतात. वेळीच उपचार न केल्यास चेतांची गंभीर हानी होते. हात आणि पायांमध्ये अशक्तपणा जाणवतो. परिणामी बोटे आणि पंजा आतील बाजूला वळतात. मायक्रोबॅक्टिरियम लेप्री  डोळ्यात शिरल्यास वेदनामय दाह निर्माण होतो आणि तीव्रता वाढल्यास अंधत्व येऊ शकते.

प्रकार 

कुष्ठरोगाचे दोन मुख्य प्रकार आहेत : (१) ग्रंथिसदृश (ट्युबरक्युलॉइड) आणि (२) कुष्ठार्बुदीय (लेप्रोमॅटस). पहिल्या प्रकारच्या बहुतांशी रुग्णांमध्ये शरीरावर एक किवा मोजकेच चट्टे आणि कमी संख्येने जीवाणू असतात. हा प्रकार प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींतच दिसतो. दुस-या प्रकारच्या कुष्ठरोगाने बाधित बहुतांशी रुग्णांच्या शरीरावर खूप चट्टे आणि त्याच्या ऊतींमध्ये लक्षावधी जीवाणू आढळतात. हा प्रकार प्रतिकारशक्ती अगदी कमी वा मुळीच नसलेल्या व्यक्तीत दिसतो. हा प्रकार फार सांसर्गिक असतो.

उपचार 

आतापर्यंत कुष्ठरोगाला प्रतिबंध करणारी कोणतीही प्रभावी व खात्रीलायक लस विकसित झालेली नाही. मात्र काही विशिष्ट औषधे कुष्ठरोगाची वाढ थांबवितात आणि रुग्णाला वेगाने ‘असांसर्गिक’ बनवितात. १९४० च्या दशकापासून कुष्ठरोगावर उपचार करण्यासाठी डॅप्सोन नावाचे सल्फा औषध वापरले जात आहे. मात्र १९८० च्या दशकात डॅप्सोन या औषधाला प्रतिरोध होत असल्याचे कुष्ठरोगबाधित अनेक रुग्णांमध्ये आढळले आहे.


कुष्ठरोग जीवाणू

डॅप्सोन-प्रतिरोधी जीवाणूंचा नाश करण्यासाठी वैद्य आता दोन-तीन वेगवेगळ्या औषधांचा वापर करून उपचार करतात. ज्या रुग्णांच्या शरीरावर कमी चट्टे आणि काही जीवाणू असतात, अशा रुग्णांना डॅप्सोन आणि रिफाम्पीन नावाचे प्रतिजैविक, अशी दोन्ही औषधे सहा महिने देतात. ज्या कुष्ठरोग्यांच्या शरीरावर अनेक चट्टे आणि अनेक जीवाणू आढळतात; अशा रुग्णांना डॅप्सोन, रिफाम्पीन आणि क्लोफॅझीमीन नावाचे रंजक ही तीन औषधे दोन वर्षे घ्यावी लागतात.

जगभरातील दीड अब्ज लोक कुष्ठरोगप्रवण क्षेत्रात राहतात. त्यामुळे प्रत्येक कुष्ठरोगबाधित व्यक्तीवर उपचार करण्याबरोबर, या रोगावर मात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्यविषयक धोरणे आखली जातात. शतकानुशतके सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांनुसार कुष्ठरोगबाधित व्यक्तीला, केवळ एकटे ठेवणे आणि अशा व्यक्तीचा वावरही फक्त रुग्णालयापुरता मर्यादित ठेवणे, असे उपाय योजले जातात. यामुळे या रोगाचा प्रसार रोखता येतो; परंतु रुग्णांसाठी हा दृष्टिकोन योग्य नाही. अशा उपायांमुळे लोकांच्या मनात कुष्ठरोगाबद्दल असलेले भय आणि गैरसमज काढण्यासाठी जगभर चाललेल्या कुष्ठरोग निवारण प्रयत्‍नांना खीळ बसत आहे.

कुष्ठरोगाच्या आधुनिक नियंत्रण कार्यक्रमांमध्ये दोन पद्धतींवर भर देण्यात आलेला आहे: (१) कुष्ठरोगाचे रुग्ण शोधण्यासाठी समाजाधिष्ठित चाचणी आणि (२) रोगांसंबंधी समाज प्रबोधन, त्वरित रोगनिश्चिती आणि तात्काळ उपचार केल्यास समाजात होणारे मायक्रोबॅक्टिरियम लेप्री जीवाणूंचे संक्रामण थांबविता येते. या रोगामुळे आलेले व्यंग काही प्रमाणात कमी करता येते. या कार्यक्रमातून शाळेतील किंवा समाजातील प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय तपासणी केली जाते. ज्यांना या रोगाचा संसर्ग झालेला आहे, त्यांवर औषधोपचार केले जातात. समाज प्रबोधन कार्यक्रमात कुष्ठरोगाविषयी असलेली भीती दूर करणे आणि रुग्णाला उपचारांसाठी प्रोत्साहित करणे, यांसाठी प्रयत्‍न केले जातात.


सल्फा औषध,

सल्फा औषध, ज्याला सल्फोनामाइड देखील म्हणतात, सल्फॅनिलामाइड आण्विक रचना असलेल्या कृत्रिम प्रतिजैविकांच्या गटाचा कोणताही सदस्य. सल्फा औषधे ही पहिली रासायनिक द्रव्ये होती जी मानवांमध्ये बॅक्टेरियाच्या संसर्गावर उपचार आणि प्रतिबंध करण्यासाठी पद्धतशीरपणे वापरली गेली. अधिक प्रभावी आणि सुरक्षित प्रतिजैविकांच्या उपलब्धतेमुळे आणि औषधांच्या प्रतिकारशक्तीच्या वाढलेल्या घटनांमुळे त्यांचा वापर कमी झाला आहे. सल्फोनामाइड्स अजूनही वापरली जातात, परंतु मुख्यत्वे मूत्रमार्गाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी आणि बर्न्सचा संसर्ग रोखण्यासाठी. ते मलेरियाच्या विशिष्ट प्रकारांच्या उपचारांमध्ये देखील वापरले जातात.

तःचे फॉलिक ऍसिड तयार करतात. तथापि, मानव आणि इतर उच्च प्राण्यांना आहारात फॉलिक ऍसिड मिळणे आवश्यक आहे. अशाप्रकारे, सल्फा औषधे यजमानाला इजा न करता आक्रमण करणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंध करू शकतात.

जेव्हा ट्रायमेथोप्रिम (डायहायड्रोफोलेट रिडक्टेज इनहिबिटर) सल्फॅमेथॉक्सा1932 मध्ये जर्मन जीवाणूशास्त्रज्ञ आणि पॅथॉलॉजिस्ट गेरहार्ड डोमाग यांनी लाल रंगाच्या प्रॉन्टोसिलच्या स्ट्रेप्टोकोकस संसर्गावरील परिणामांची नोंद केली तेव्हा सल्फोनामाइड्सचे बॅक्टेरियाविरोधी प्रभाव प्रथम 1932 मध्ये दिसून आले. नंतर फ्रेंच संशोधकांनी हे सिद्ध केले की प्रॉन्टोसिलचा सक्रिय घटक सल्फॅनिलामाइड किंवा पॅरा-एमिनोबेन्झेनेसल्फोनामाइड होता, जो प्रॉन्टोसिलच्या शरीराच्या चयापचयाचे उत्पादन होते. 1940 च्या दशकात सल्फॅनिलामाइड हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे औषध होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान पांढर्‍या सल्फॅनिलामाइड पावडर उघड्या जखमांवर उपचार करण्यासाठी प्रथमोपचार किटमध्ये मानक बनले आणि आतड्यांसंबंधी संक्रमणाशी लढण्यासाठी सल्फॅनिलामाइड गोळ्या घेतल्या गेल्या. औषध तुलनेने सुरक्षित असले तरी, त्वचेवर पुरळ उठणे, ताप येणे, मळमळ होणे, उलट्या होणे आणि अगदी मानसिक गोंधळ यासारख्या ऍलर्जीच्या प्रतिक्रिया सामान्य होत्या. कमी-विषारी डेरिव्हेटिव्ह्जचा परिचय आणि विशेषत: पेनिसिलिनच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासह, त्याचा वापर कमी झाला.

इतर अनेक सल्फा औषधे 1940 च्या दशकात सल्फॅनिलामाइडपासून तयार केली गेली, ज्यात सल्फाथियाझोल (पद्धतशीर जिवाणू संक्रमण), सल्फाडियाझिन (मूत्रमार्ग आणि आतड्यांसंबंधी संक्रमण), आणि सल्फामेथाझिन (मूत्रमार्गाचे संक्रमण) यांचा समावेश आहे. तथापि, सर्व सल्फा औषधांनी वर सूचीबद्ध केलेल्या काही दुष्परिणामांना प्रेरित केले आणि औषधांच्या संपर्कात आल्यानंतर जीवाणूंनी प्रतिरोधक ताण निर्माण केला. काही दशकांतच अनेक सल्फा औषधांनी अधिक-प्रभावी आणि कमी-विषारी प्रतिजैविकांची पसंती गमावली.

ट्रायसल्फापायरीमिडीन (ट्रिपल सल्फा), सल्फाडियाझिन, सल्फामेराझिन आणि सल्फामेथाझिन यांचे मिश्रण, योनिमार्गाच्या संसर्गाच्या उपचारांमध्ये वापरले जाते आणि त्वचेच्या जळजळीपासून ते मलेरियापर्यंत, न्यूमोनियापर्यंत विस्तृत परिस्थितींवर उपचार करण्यासाठी अनेक सल्फा औषधे प्रतिजैविकांच्या संयोजनात वापरली जातात. एचआयव्ही/एड्स रुग्णांमध्ये.

सल्फा औषधे बॅक्टेरियोस्टॅटिक आहेत; म्हणजेच, ते जीवाणूंची वाढ आणि गुणाकार रोखतात परंतु त्यांना मारत नाहीत. ते सर्व जिवंत पेशींमध्ये असलेल्या व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे सदस्य फॉलिक ऍसिड (फोलेट) च्या संश्लेषणात हस्तक्षेप करून कार्य करतात. बहुतेक जिवाणू त्यांचे स्वझोलसह दिले जाते, तेव्हा दोन औषधांद्वारे उत्पादित मार्गातील अनुक्रमिक अडथळा फॉलीक ऍसिड संश्लेषणास स्पष्टपणे जास्त प्रतिबंधित करते. परिणामी, हे संयोजन मूत्रमार्गातील संक्रमण आणि काही प्रणालीगत संक्रमणांवर उपचार करण्यासाठी मौल्यवान आहे.

सल्फोन्स सल्फोनामाइड्सशी संबंधित आहेत आणि फॉलिक ऍसिड संश्लेषणाचे अवरोधक आहेत. ते त्वचेत आणि फुगलेल्या ऊतींमध्ये जमा होतात आणि ते ऊतकांमध्ये दीर्घकाळ टिकून राहतात. अशा प्रकारे, डॅप्सोनसारखे सल्फोन्स कुष्ठरोगाच्या उपचारात उपयुक्त आहेत.


नायटा (गजकर्ण):

नायटे निरनिराळ्या प्रकारचे असतात. नेहमी दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर, जांघेत, कमरेवर दगडफूलासारखा दिसणारा व पसरणारा नायटा. यात त्वचा काळवंडते आणि खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो. याची मुख्य करणे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई, एकमेकांचे कपडे वापरणे इ. अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी आडोसा पुरेसा नसतो. यामुळे कंबरेच्या कपड्याखाली नीट स्वच्छता राहत नाही. याठिकाणी खरुज, नायटा वाढतात. कडा असलेल्या गोलाकार स्वरुपात त्वचेवर उठणारा नायटा हा एक प्रकारच्या बुरशी, आळब्यासारख्या सुक्ष्म शेवाळामुळे होणारा रोग आहे. चामडीच्या कोणत्याही भागावर गोलाकार चट्टे उठतात. पण विशेषतः काखा, जांघा, बोटांच्या मधील भाग इ. नेहमी ओलसर राहणाऱ्या जागांमध्ये याचे प्रमाण जास्त असते. आपल्याकडे डोक्यामध्ये होणाऱ्या नायटाचे प्रमाण त्यामानाने कमीच आहे. कंबर व जननेन्द्रियाजवळील भागाला सुद्धा नायटा होतो. हे चट्टे गोलाकार असल्यामुळे त्यांना रिंग वर्म म्हणतात. त्यांना कमालीची खाज सुटते. जर हा चट्टा केसात झाला तर केस जावून तेवढया ठिकाणी टक्कल पडते आणि नखांवर झाला ते नखे वर उचलली जाऊन खरखरीत व वाकडी होता.

नायटे निरनिराळया प्रकारचे असतात. नेहमी दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर,जांघेत कमरेवर दगडफुलासारखा दिसणारा व पसरणारा नायटा. यांत त्वचा काळवंडते आणि खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो. याची मुख्य कारणे म्हणजे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई,एकमेकांचे कपडे वापरणे, इत्यादी.
अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी आडोसा पुरेसा नसतो. यामुळे कंबरेच्या कपडयाखाली नीट स्वच्छता राहत नाही. या ठिकाणी खरूज, नायटा, गजकर्ण वाढतात
लक्षणे हे दोन्हीही आजार कंबर, पोट, मांडया,जांघा, इत्यादी भागांत जास्त करून होतात. यामुळे खूप खाज सुटते. गजकर्ण व नायटयाची वाढ वेगाने होते, पण कातडीवर बधिरता मात्र नसते. यावरून कुष्ठरोगापासून हे आजार वेगळे ओळखता येतात. (कुष्ठरोगात चट्टयांना खाज सुटत नाही व कमी अधिक बधिरता येते.)
लक्षणे
1. हा आजार कंबर, पोट, मांड्या, जांघा इ. भागात जास्त करून होतात.
2. खूप खाज सुटते व नायटाची वाढ वेगाने होते.
3. पण कातडीवर बधीरता मात्र नसते.

उपचार
स्वच्छता ही प्रथम महत्त्वाची आहे. - (रोज आंघोळ करणे, नखे कापणे.)
गजकर्ण, नायटयाचा भाग गरम पाणी व साबणाने स्वच्छ धुऊन नायटा मलम (व्हिटफिल्ड) रोज चोळून लावावे. व्हिटफिल्ड मलमाने सुरुवातीला आग होते, पण दोन-तीन आठवडयांत आराम पडतो व चट्टा जातो. नंतर आठवडाभर तरी मलम लावत राहावे. नाही तर नायटा परत उमटतो. व्हिटफिल्ड मलमापेक्षा मायकोल मलम जास्त चांगले आहे. याचा परिणाम लवकर (10 दिवसांत) होतो.
- नखे कापावीत.
- नायटा झालेला भाग साबण व स्वच्छ पाण्याने रोज धुतला तर हा रोग बरा होतो.
- हेक्झाक्लेरोफिन असलेल्या साबणाचा जास्त उपयोग होतो.
- घामाने भिजलेले सगळे कपडे नेहमी बदलावेत व स्वच्छ धुवून कोरडे असतांना वापरावे.
- नायटा झालेली जागा नेहमी स्वच्छ ठेवून ती सुर्यप्रकाशात राहील असा प्रयत्न करावा. १ भाग सल्फर व १० भाग तेल यांचे मिश्रण करून नायटा झालेल्या जागी लावावे.
- बाजारात मिळणारी नायटा, गजकर्ण विरोधी मलमे आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.
- डोक्यात खवडे झाले असल्यास बाजारात मिळणारी मलमे आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावीत.
- डोक्यातील नायटा पाण्याचा शेक देऊन तेथील केस उपटून वरील औषधांचा उपयोग करावा.

आयुर्वेद
गजकर्णासाठी उपाय करताना त्वचा कोरडी राहील अशी काळजी घेणे आवश्यक आहे. (अ) गजकर्णाच्या भागावर करंजतेलाचा बोळा घासावा.(ब) या बाह्य उपचाराबरोबर कोठा स्वच्छ राहण्यासाठी त्रिफळा चूर्ण (चमचाभर) कोमट पाण्याबरोबर रोज रात्री याप्रमाणे 10दिवस घ्यावे. नायटयासाठी आणखी एक पर्यायी बाह्य उपाय म्हणजे बहाव्याची कोवळी पाने वाटून सकाळ- संध्याकाळ लेप द्यावा.

नायटा कसा टाळावा ?
नायटा व त्यासारखे चामडीचे बुरशीजन्य इतर विकार सांसर्गिक असल्यामुळे एकाकडून दुसऱ्याला चटकन होतात, ते टाळण्यासाठी पुढील गोष्टी कराव्यात.

नायटा झालेल्या रुग्णाला वेगळे झोपवावे.
1. एकच फणी व एकमेकांचे कपडे ( स्वच्छ धुऊन वाळविल्याशिवाय) वापरू नयेत.
2. नायटा झालेल्या रुग्णांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरात लवकर उपचार करावेत.
3. बाह्य उपचारांबरोबरच पोट सुद्धा साफ असणे गरजेचे आहे. त्वचा नेहमी कोरडी राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.

कडुलिंब

निम्ब , लिंब (किंवा कडुलिंब, बाळंतलिंब; शास्त्रीय नाव: Azadirachta indica; कूळ : Meliaceae) हा भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांगलादेश या देशात आढळणारा एक वृक्ष आहे. या वृक्षाची पाने कडू असल्याने त्याला कडुनिंब म्हटले जाते. या झाडामुळे प्रदूषण होत नाही.

वर्णन

कडुलिंब हा मोठा, ३०-६० फूट उंच वाढणारा छायादार वृक्ष आहे. याला साधारणत: ९ ते १५ इंच लांब देठ व त्यास सम अंतरावर, हिरव्या रंगाची २-३ सेंटिमीटर लांबीची, टोकदार, करवतीसारखे दाते असणारी ९ ते १५ पाने येतात . पानांच्या दोन्ही बाजू वेगवेगळ्या (oblique leaf ) सुरू होतात. कडुलिंबाची फुले पांढरी, लहान व सुगंधित असतात. तर फळे आधी हिरवी व पिकल्यावर पिवळी होतात. जवळपास ३-४ मिलिमीटर लांब असलेल्या या फळांत प्रत्येकी एक बी असते.त्या बियांना निंबोळी किंवा लिंबोणी असे म्हणतात. कडुलिंबाच्या लाकडाचा वापर इमारतीत व पेट्या वगैरे बनविण्यासाठी होतो.

 कडुनिंब हे संपूर्ण भारतात आढळणारे, नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे. याला लिंबाच्या रंगाची छोटी छोटी कडू चवीची फळे लागतात, म्हणून याचे नाव कडूलिंब. या झाडाची पाने, फळे, बिया, साल, मुळे सर्चव कडू असतात. याच्या अनेक उपयोगांमुळे हे सर्वांचे आवडते झाड आहे. कडू असल्यामुळे 'जंतुघ्न'हा याचा गुणधर्म पशु-पक्षी, पीक, मानव या सर्वांसाठी वापरला जातो. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने, फुले, लहान कोवळी फळे, जिरे, मिरे,सैन्धव मीठ, ओवा, गूळ, हिंग, चिंच हे सर्व एकत्र वाटून त्याची गोळी करून खातात.कडुलिंबाचे झाड मोठे म्हणजे सर्वसाधारणपणे आठ ते दहा मीटर उंच वाढते. याचे खोड सरळ वाढते; नंतर याला फांद्या फुटतात.या झाडाची साल काळी व खडबडीत असते. याची पाने हिरवी,मध्यम आकाराची व लांबट असतात. पानाच्या कडेने नक्षी असते. एका काडीला दहा ते बारा पाने येतात. पानाचा देठ बारीक असतो. चव कडू असते. कडुलिंबाच्या झाडाची सावली(छाया) थंड असते. या कडुलिंब झाडाच्या सावलीतील (छायेतील) घर उन्हाळ्यात थंड राहते.

आपल्या आजूबाजूच्या परिसरात आढळणारा वृक्ष म्हणजे कडुलिंब होय. हा वृक्षसुद्धा हिंदू धर्मात महत्त्वाचा मानला जातो.

 कडुलिंबचे झाड मोठे असते.हे झाड सर्वसाधारणपणे आठ ते दहा मीटर उंच वाढते.याचे टखोड सरळग वाढते;नंतर याला फांद्या फुटतात.या झाडाची साल काळी व खडबडीत असते. याची पाने हिरवी,मध्यम आकाराची अ लांबट अंसतात.पानाच्या कडेने नक्षी असते.एका काडीला दीहा ते बारा पाने येतात.पानाचा देठ बारीक असतो. चव कडवट असते.या झाडाची फुले लहान,पांढरया रंगाची तसेच सुगंधी असतात.या झाडाची फळे कच्ची असताना हिरवी व पिकल्यावर पिवळ्या रंगाची दिसतात.त्या फळाचा आकार लहान असतो.त्यात बी असते.त्याला लीबोळी असे ?

औषधी महत्त्व

कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे.याची पाने,काड्या वाटून,त्याचा रस उन्हाळात प्रशान केल्याने उन्हाचा त्रास होत नाही. बुद्धी तल्लख होते. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत. दाताना बळकटी येते. तसेच मुल्व्याधी पोटातील कृमीवरउपाय म्हणून काम करते, कडूलिंबाची पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन,पेस्ट यामध्ये पण कडूलिंबाचा वापर करतात.

गुणधर्म

उन्हाळ्यामुळे गोवर, कांजिण्या, ह्या सारखे रोग उद्भवतात, अश्यावेळी रोग्याला कडुनिंबाच्या पानांच्या अंथरुणावर झोपवून मंत्र म्हणत असत.

पूर्वी स्त्रियांना प्रसूतीनंतर तीन दिवस जेवणाच्या आधी कडुलिंबाच्या पानांचा रस देत असत. त्यामुळे मातेला दूधही जास्त येत असे. व्यालेल्या गाईलाही कडुनिंबाचा पाला खाण्यास देत असत.

कडुलिंबामध्ये आयुर्वेदिक गुणधर्मही असतात व ते कडू, विपाकी, शीतवीर्य, लघु, मंदाग्निकर-खोकला, ज्वर, अरुची, कृमी, कफ, कुष्ठ नाशक म्हणून वापरले जाते. हा जणू कल्पवृक्षच आहे.

औषधी महत्त्व

कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे.याची पाने, काड्या वाटून, त्याचा रस उन्हाळात प्रशान केल्याने उन्हाचा त्रास होत नाही. काही लोक हा पेलाभर रस रोज पितात. त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो; सडसडीत माणसे सडसडीतच राहतात. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत. दाताना बळकटी येते. तसेच मुळव्याध व पोटातील कृमींवर उपयोगी आहे. कडुलिंबाची वाळलेली पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन, पेस्ट यामध्ये पण कडुलिंबाचा वापर करतात.

रस काढून, त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात. मधुमेह या रोगा मध्ये नीम अतिशय ऊपयुक्त आहे.यक्रुत विकारांमधे नीम त्याच्या कडू रसाने काम करते. रोज अर्धा कप नीम रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रित करता येतो.

कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे.याची पाने, काड्या वाटून, त्याचा रस उन्हाळात प्रशान केल्याने उन्हाचा त्रास होत नाही. बुद्धी तल्लख होते. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत. दाताना बळकटी येते. तसेच मुल्व्याधी पोटातील कृमीवर कडूलिंबाची पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन,पेस्ट यामध्ये पण कडूलिंबाचा वापर करतात.

उपयोग

काड्या दांत घासण्यास उपयोगी, लाकूड इमारतीसाठी.

आयुर्वेदानुसार - जंतुनाशक, सापाच्या विषावर, गर्मीवर, रक्तदोषहारक, विषमज्वरावर, कृमिनाशक, दाहावर, महारोगावर, बाळंतरोगावर, अफूच्या उतारासाठी, जखमेवर, मुळव्याध, मधुमेह, इ. अनेक रोगांवर

यापासून बनणाऱ्या औषधी - पंचनिंबचूर्ण, अनेक औषधांमधील एक प्रमुख घटक.

कडुलिंब या झाडाची पाने खोबरेल तेलात काळी होईपर्यंत उकळायची आणि ते तेल नियमितपणे लावल्याने केसांची वाढ जोमाने होते. केसांच्या अनेक समस्या दूर होतात.

पोटात जंत झाले तर पानांचा रस काढून एक चमचा रसात थोडा (अगदी चिंचोक्याएवढाच) गूळ घालून तीन दिवस प्याल्यास जंत बाहेर पडतात.

अंगाला खाज सुटत असेल तर पानाचा रस सर्व अंगाला किंवा आंघोळीच्या गरम पाण्यात दहा -बारा कडुलिंबाची पान ठेचून घालावी.

ताप आल्यास सकाळ-संध्याकाळ कडुलिंबाच्या सालीच्या काढा घेतात.

कडुलिंबाची पान जखमेवर कुटून लावल्यास जखम लवकर बरी होते. निबोण्यांचे तेलही औंषधी आहे.

रक्त दूषित झाल्यावर त्वचेवर डाग पडतात, तेव्हा हे तेल लावतात. औषधी गुणधर्म आहेत. या झाडाचे साल, मूळ, पान, बिया सर्वच औषधीं आहेत.

सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे कडुनिंब हे अत्युत्तम जंतुनाशक आहे. ह्याच्या पानांची पूड शेतात पसरल्यास खत म्हणून उपयोगी तर पडतेच पण त्यापेक्षाही रोपांना किडीपासून दूर ठेवते.

कडुलिंब वनस्पतीचे गुणधर्म आणि उपयोग : उपचार हा जखम बरे करण्यासाठी

कडूलिंबाने कुरूप डाग न सोडता जखमा बरी करता येतात. तसेच सेप्टिक इन्फेक्शनपासून बचाव करते. कडूलिंब सामान्यत: जंतुनाशक गुणधर्मांमुळे जखमा भरण्यासाठी वापरला जातो. रोज जखमांवर आणि डागांवर कडुनिंबाच तेल थोडीश्या प्रमाणात लावावे. कडुनिंबाच्या तेलात आवश्यक फॅटी ऍसिडस् असतात, जे जखम लवकर बरी होण्यासाठी मदत करतात आणि आपली त्वचा निरोगी बनवते.

 

कडुलिंब वनस्पतीचे गुणधर्म आणि उपयोग : मुरुमांपासून मुक्तता मिळवण्यासाठी

कडुनिंबामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुण देखील आहे ज्यामुळे मुरुम कमी होते. कडूलिंबाच्या तेलाने त्वचा कोरडेपणा, त्वचेचा खाज सुटणे आणि लालसरपणा दूर होतॊ. कडुनिंब हे लवकर मुरुम करण्यासाठी आणि त्वचेचे सैंदर्य वाढवते. अश्या प्रकारे कडुलिंब याचा वापर केला जातो.

कडुनिंब देखील त्वचेसाठी मॉइश्चरायझरचा उत्कृष्ट स्रोत आहे. कडूलिंबाच्या तेलाचा वापर करून त्यातील फॅटी ऍसिडस् आणि जीवनसत्त्वे आपल्या त्वचेला नमी देतात आणि मऊ करतात, त्यामुळे त्वचा डाग विरहित आणि तरूण बनवते. कडुनिंबाच्या तेलातील व्हिटॅमिन ई खराब झालेल्या त्वचेची दुरुस्ती करते आणि पर्यावरणातील बदलांचा प्रभाव देखील कमी करते ज्यामुळे त्वचेचे होणारे वाईट परिणाम होते.

इतर

हा उत्तराभाद्रपदा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

 

कडूलिंबची झाडे जिथे जास्त प्रमाणात असतात तेथील हवा शुद्ध राहते. या झाडाच्या फळांचा रस काढून, त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात.

धार्मिक महत्त्व

मराठी महिन्याची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुडीपाडव्याला होते.त्या दिवशी गुडी उभी करताना कडूलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तसेच त्या झाडाच्य फुलांची मिरपूड,मीठ,गुळ घालून केलेली चटणी खावी,अशी प्रथा आहे.

धार्मिक महत्त्व

मराठी वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुडीपाडवा या दिवशी होते. त्या दिवशी गुढी उभी करताना कडूलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तसेच त्या झाडाच्या फुलांची मिरपूड, मीठ, गूळ घालून केलेली चटणी खावी, अशी प्रथा आहे. हिंदूंचे नवीन शालिवाहन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होते. चैत्र महिन्यात झाडांना नवी पालवी फुटते आणि उन्हाचा कडाका जाणवू लागतो. उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढून नाना प्रकारचे आजार होतात. अशा आजारांचे प्रमाण कमी व्हावे आणि आपली प्रतिकारशक्ती वाढावी, आपले नवीन वर्ष आरोग्यपूर्ण जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडुनिंबाचे सेवन सांगितले आहे.

मराठी महिन्याची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुडीपाडव्याला होते.त्या दिवशी गुडी उभी करताना कडूलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तसेच त्या झाडाच्य फुलांची मिरपूड, मीठ, गुळ घालून केलेली चटणी खावी अशी प्रथा आहे

इतर माहिती

कडूलिंबची झाडे जिते जास्त प्रमाणात असतात तेथील हवा शुद्ध राहते. या झाडाच्या फळांचा रस काढून,त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात.

 क्षयरोग  आणि त्यावरील उपचार 

क्षयरोग : हा रोग प्राचीन काळापासून जगातील अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहे. भारतीय वैद्यकात त्याचा उल्लेख राजयक्ष्मा किंवा क्षय असा आढळतो. क्षय हा शब्द झीज या अर्थाने वापरला जात असल्यानेव इतर दीर्घकालिक आजारांमध्येही शरीराची झीज होत असल्यानेत्याची व्याप्ती आजच्यापेक्षा अधिक असावी. तरीही फुप्फुसाच्या क्षय-रोगास कफक्षय या नावाने ओळखले जात असावे. ग्रीक वैद्यकातही ॲरिस्टॉटलच्या काळापासून हा रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्यास होत असल्याचे माहीत होते. इंग्रजीत कन्झम्पशन हा शब्द क्षय या अर्थाने वापरला जातो.

आधुनिक पाश्चात्त्य वैद्यक (ॲलोपॅथी)

एकोणिसाव्या शतकात लूई (ल्वी) पाश्चर यांचा सूक्ष्मजंतुवाद रोगनिर्मितीच्या कारणांमध्ये अंतर्भूत होऊ लागला. त्याच सुमारास १८६२ मध्ये ए. जे. विलेमिन या फ्रेंच लष्करी वैद्यांनी कफक्षयामुळे मेलेल्या एका माणसाचे शवविच्छेदन केले. त्यात आढळलेल्या ऊतकाचे (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिका समूहाचे) अंतःक्षेपण (इंजेक्शन) एका सशाला दिल्यानंतर साडेतीन महिन्यांनी त्याच्या फुप्फुसात कफक्षय झाल्याचे विलेमिन यांना आढळले. लवकरच १८८२ मध्ये ⇨ रॉबर्ट (रोबेर्ट) कॉख या जर्मन शास्त्रज्ञांनी क्षयरोगाचे सूक्ष्मजंतू शोधून काढले. त्या शोधामुळे क्षयरोगाचे कारण निश्चित झाले. अनेक वर्षे हा विकार ‘कॉख विकार’ या नावाने ओळखला जात असे.

क्षयरोगाच्या निर्मितीस मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस हे सूक्ष्मजंतू कारणीभूत असतात. त्यांचा प्रसार रुग्णाच्या खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या द्रवाच्या सूक्ष्म थेंबांमुळे होतो. एका शिंकेमध्ये सु. ४०,००० सूक्ष्मथेंब बाहेर पडतात व प्रत्येक सूक्ष्म थेंब क्षयरोग पसरवू शकतो. हवेत पसरलेल्या या थेंबात हे सूक्ष्मजंतू अनेक तास जिवंत राहू शकतात. निरोगी व्यक्तीचा अशा सूक्ष्मजंतूंशी श्वसन मार्गे वारंवार संपर्क आल्यामुळेरोगसंसर्ग होतो. संसर्ग झालेल्या जवळपास ९०% रुग्णांमध्ये लक्षणेदिसत नाहीत. क्षयग्रस्त मातेकडून तिच्या भ्रूणास किंवा जन्म झाल्यानंतर अर्भकास संसर्ग होण्याची शक्यता असते. या सूक्ष्मजंतूंची दुसरी एक प्रजातीमा. बोव्हीस या नावाने ओळखली जाते. तिचा संसर्ग दुभत्या जनावरांकडून पाश्चरीकरण न केलेल्या दुधामुळे माणसास होऊ शकतो.

क्षयरोगाच्या सूक्ष्मजंतूंचा श्वसन मार्गावाटे फुप्फुसांत शिरकाव झाल्यावर शरीराची प्रतिकार यंत्रणा त्यांचा नाश करते परंतु तसे न झाल्यास, म्हणजे प्रतिकार कमी पडल्यास किंवा संसर्ग मोठा असल्यास, संसर्गाच्या ठिकाणी म्हणजे फुप्फुसाच्या एखाद्या भागात श्वेत कोशिका आणि तंतुमय ऊतक यांच्या मदतीने तो बंदिस्त केला जातो. अशा बंदिस्त स्थितीत हे सूक्ष्मजंतू दीर्घ काळ सुप्तावस्थेत राहू शकतात. शरीराची प्रतिकारक्षमता कमी झाल्यास [उदा., उतारवय, रोगप्रतिकारक्षमतान्यूनताजन्य रोग (एड्स), कुपोषण, दीर्घ काळ स्टेरॉइड औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर] ते परत सक्रिय होतात व आसपासच्या ऊतकांचा नाश करू लागतात किंवा रक्तातून शरीरभर पसरून अनेक ठिकाणी वाढू लागतात.

लक्षणे : फुप्फुसाच्या क्षयरोगात अशक्तपणा, वजन घटणे व खोकला या लक्षणांपासून प्रारंभ होतो. तसेच रात्रीच्या वेळी अतिशय घामयेतो. रोगाची तीव्रता वाढू लागल्यावर प्रामुख्याने सकाळी उठल्यावर खोकल्याबरोबर कफ पडू लागतो. कधीकधी त्यात रक्ताचा अंश आढळू लागतो. बारीक ताप येतो. फुप्फुसावरणाचा शोथ होऊन वक्षपोकळीमध्ये पाणी साठल्यास [→ परिफुप्फुसशोथ] किंवा हवेचा शिरकाव झाल्यास फुप्फुसावर दडपण येऊन धाप लागते. लहान मुलांत नवीनच रोग संसर्ग झाला असल्यास मानेतील लसीका ग्रंथींना सूज येते आणि एक विशिष्ट प्रकारचा आवाज करणारा खोकला येऊ लागतो [→ गंडमाळा].

फुप्फुसेतर ठिकाणच्या विकारातील लक्षणे विविध प्रकारची असतात, उदा., मेंदूच्या आवरणातील क्षयरोगात [→ मस्तिष्कावरणशोथ] प्रारंभी डोकेदुखी, मान अखडणे, ताप, मळमळणे, झापड येणे व नंतर शुद्ध हरपणे, आकडीसारखे अपस्माराचे झटके उदरपोकळीतील इंद्रियांच्या विकारात पोटात दुखणे, एखाद्या ठिकाणी अर्बुदाप्रमाणे गाठ जाणवणे, पचनात बिघाड सांध्यांमधील विकारात ⇨ संधिवातासारखी लक्षणे मणक्याच्या विकारात तीव्र वेदना आणि मणका ठिसूळ होऊन भंग पावल्यामुळे मेरुरज्जूवर दाब येऊन पक्षाघात किंवा फक्त पायाच्या संवेदना व हालचालींवरअनिष्ट परिणाम स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या जननेंद्रियातील विकारामुळेसूज, गाठ जाणवणे व वंध्यत्व. सर्व शरीरात पसरलेल्या ‘मिलियरी’ क्षयरोगात शरीरभर सर्व ऊतकांमध्ये डाळीच्या आकाराच्या क्षयविकृतींची वाढ होते. या प्रकारात लक्षणे फारच संदिग्ध असतात, परंतु लवकरच ती झपाट्याने वाढून गंभीर होतात व प्राणघातक ठरू शकतात.

निदान : क्ष-किरण चित्रण, थुंकी तपासणी आणि ट्युबरक्युलीनचाचणी या तीन परीक्षणांची मदत क्षयरोगाच्या निदानात होते. यापैकीक्ष-किरण चित्रण मुख्यतः फुप्फुसाच्या विकारासाठी वापरले जाते. कफ पडत नसून नुसताच खोकला येत असल्यास क्ष-किरण चित्रणामुळे मदत होते. या चित्रात सूक्ष्मजंतूंच्या वाढीमुळे फुप्फुसाच्या ऊतकांत तयारझालेली वर्तुळाकार पोकळी बऱ्याच वेळा आढळते परंतु अनेकदा सर्व छातीभर अल्प प्रमाणात झालेला बदलही दृष्टीस पडतो. परिफुप्फुसीयपोकळीत साठलेले पाणी किंवा हवा याचेही दर्शन अशा चित्रणातून मिळते. यातील बहुतेक बदल क्षयरोगामुळे झाले आहेत असा निष्कर्ष रुग्णाचा इतिहास, दीर्घकालिकता, संसर्गाची शक्यता यांवरून काढता येतो परंतु थुंकीमध्ये क्षयाचे सूक्ष्मजंतू आढळल्यास निदानास अधिक बळकटीयेते. श्वसन मार्गाखेरीज इतर ठिकाणच्या क्षयजन्य बदलांची व्याप्तीहीक्ष-किरण चित्रणामुळे कळू शकते.

श्वसन मार्गातील द्रवाचे म्हणजेच कफाचे (यालाच सामान्यपणे थुंकी म्हणतात) नमुने तपासणीसाठी उपलब्ध असल्यास सूक्ष्मदर्शकातून मायकोबॅक्टिरियम दिसू शकतात. यासाठी विशेष रंजनप्रक्रियेची आवश्यकता असते [→ कुष्ठरोग]. तसेच जंतूंची संख्या फार कमी असल्यास वारंवार – तीन ते चार वेळा – नमुने घेतल्याशिवाय ते सहजासहजी दिसू शकत नाहीत. क्वचित प्रसंगी नमुना मिळविण्यासाठी श्वसनीदर्शकाच्या मदतीने आतील द्रव गोळा करावा लागतो. उपचार सुरू केल्यानंतर थुंकी सूक्ष्म- जंतुविहीन झालेली आहे, म्हणजेच रुग्णाकडून इतरांना संसर्ग होणार नाही याची खात्री करण्यासाठी थुंकी तपासणी वरचेवर करणे आवश्यक ठरते. कफाखेरीज इतर ठिकाणचे द्रव, ऊतकांचे नमुने, मूत्र, मेरुरज्जूभोवतालचे प्रमस्तिष्क मेरुद्रव यांचे नमुनेही क्षयरोगाच्या निदानात उपयोगी पडतात. 

ट्युबरक्युलीन चाचणीत क्षयरोगाच्या सूक्ष्मजंतूंपासून काढलेले प्रथिन-द्रव्य हाताच्या त्वचेत (मनगट व कोपर यांच्या मधल्या भागात) टोचतात. २-३ दिवसांत त्या ठिकाणी सूज व लाली निर्माण होते. व्यक्तीस कधीतरी संसर्ग झाल्यामुळे त्याची प्रतिरक्षा यंत्रणा क्षयरोगाविरुद्ध प्रतिपिंड निर्माण करीत आहे, असा याचा अर्थ होतो परंतु याचा अर्थ सक्रिय क्षयरोग अस्तित्वात आहेच असा नव्हे. त्यामुळे या चाचणीची उपयुक्तता मर्यादित आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस क्षयरोगाला प्रतिबंधक लस तयार करण्याच्या प्रयत्नात कॉख यांनी ट्युबरक्युलीन तयार केले होते परंतु ते रोगाचा प्रतिबंध करण्यास असमर्थ आहे, असे लवकरच दिसून आले. त्यापासूनच तयार केलेले प्रथिनद्रव्य ट्युबरक्युलीन चाचणीसाठी उपयुक्त ठरले. फ्रेंच वैद्य चार्लस् मांटू यांच्या नावाने ही चाचणी ओळखली जाते.

उपचार : क्षयरोगाच्या सूक्ष्मजंतूंचा शोध लागल्यानंतरही अनेक वर्षे एखादे प्रभावी औषध उपलब्ध नसल्याने लक्षणानुवर्ती उपचारच केलेजात. खोकल्यावरची औषधे, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व पोषणासाठी कॉड लिव्हर तेल आणि रुग्णास विश्रांतीसाठी कोरड्या हवेच्या ठिकाणी लोकवस्तीपासून दूर ठेवणे यावर भर दिला जाई. संसर्गित फुप्फुसालाविश्रांती मिळाल्यास व ऑक्सिजनाचा पुरवठा कमी केल्यास जंतूंचीवाढ थांबेल या कल्पनेने काही उपाय केले जात. परिफुप्फुसीय पोकळीत किंवा उदरपोकळीत हवा भरून तिच्या दाबाने फुप्फुसाचे आकारमान कमी करण्याचा प्रयत्न केला जाई. कधीकधी फुप्फुसाचा विकारग्रस्त खंड शस्त्रक्रियेने काढून टाकण्याची आवश्यकता भासत असे.

प्रतिजैविकांच्या (अँटिबायॉटिक पदार्थांच्या) मालिकेतील स्ट्रेप्टोमाय –सिनाचा शोध सेल्मन आब्राहम वेक्समन यांनी १९४४ मध्ये लावल्यानंतर हे चित्र बदलले. त्यानंतरच्या २५–३० वर्षांमध्ये आयसोनियाझिड, पॅरा- ॲमिनोसॅलिसिलिक अम्ल (पीएएस PAS), इथँब्युटॉल व रायफँपीन ही औषधे उपलब्ध झाली. त्याबरोबरच हेही लक्षात आले की, क्षयरोगाची औषधे दीर्घकाल देणे आवश्यक असते. सूक्ष्मजंतू काही काळाने औषधाला दाद देत नाहीत आणि औषधांची निष्प्रभता टाळण्यासाठी व दुष्परिणामहोऊ नयेत म्हणून उपचारासाठी एका वेळी कमीत कमी दोन औषधेदेणे व औषधांची मिश्रणे वारंवार बदलणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या उपचाराच्या प्रारंभिक सत्रासाठी ४-५ औषधे व पर्यायी योजनेसाठीइतर ७-८ औषधे उपलब्ध आहेत. यापैकी स्ट्रेप्टोमायसीन अंतःक्षेपणाच्या स्वरूपात असल्यामुळे आणि पास याची मात्रा मोठी असल्यामुळे सध्याती फारशी वापरात नाहीत.

उपलब्ध औषधांचे प्राधान्य क्रमानुसार पुढील तीन वर्ग केले जातात : प्रथम प्राधान्य : आयसोनियाझिड, पिरॅझिनामाइड, रायफँपीन (I, P, R) ही तीन सूक्ष्मजंतूंना मारक औषधे इथँब्युटॉल हे सूक्ष्मजंतुरोधक (E). द्वितीय प्राधान्य : सिप्रोफ्लोक्सासीन, मॉक्सिफ्लोक्सासीन, पॅराॲमिनोसॅलिसिलिक अम्ल. तृतीय प्राधान्य : थायासिटॅझोन, थायोरिडॅझीन, क्लॅरिथ्रोमायसीन, रिफाब्युटीन आणि अन्य औषधे उदा., इथिओनामाइड, सायक्लोसेरीन.

उपचाराच्या प्रारंभी क्षयरोग सूक्ष्मजंतूंची संख्या वेगाने कमी करण्यासाठी प्रथम प्राधान्याची आयसोनियाझिड, पिरॅझिनामाइड व रायफँपीन ही तीन औषधे दोन महिने दिली जातात. नंतर चार महिने आयसोनियाझिडव रायफँपीन देण्यात येते. या सहा महिन्यांच्या उपचारानंतर बहुतेक सर्वरुग्ण बरे होतात. उपचार थांबल्यावर सु. ३% रुग्णांमध्ये रोगाचा पुनरुद्भव होण्याची शक्यता असते. त्यामुळे वरचेवर तपासणी आवश्यक असते. आवश्यक वाटल्यास द्वितीय किंवा तृतीय प्राधान्यांतील औषधे वापरून आणखी चार महिने ते एक वर्ष उपचार पुढे चालू ठेवावे लागतात. औषधाची निवड आणि उपचाराचा काळ याबद्दलचे कार्यक्रम क्षयरोग सूक्ष्मजंतूंची प्रतिकारक्षमता, अनिष्ट परिणाम आणि रुग्णांची रोगप्रतिकार-क्षमता यांनुसार विसाव्या शतकाअखेरीस व एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी अनेकदा बदलावे लागले आहेत. जागतिक आरोग्य संघटना (WHO) याबद्दल वरचेवर मार्गदर्शन करीत असते.

असाच एक कार्यक्रम १९९३ पासून डॉट्स (DOTS) या नावाने अंमलात आला. रुग्णांना बरीच औषधे घ्यावी लागतात, त्यामुळे सूचनांचे अनुपालन नीट होत नाही. ते सुधारण्यासाठी रुग्णांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत औषध घ्यावे, हे या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.त्यामुळे क्षयरोगाच्या निर्मूलनास चालना मिळाली आहे. शासकीय आणि अशासकीय यंत्रणांच्या मदतीने औषधांचा पुरवठा करून औषध-प्रतिकारक – विशेषतः बहुऔषधप्रतिकारक – क्षयरोग सूक्ष्मजंतू असलेल्या शतप्रतिशत रुग्णांवर यशस्वी उपचार करण्याचे उद्दिष्ट या कार्यक्रमाद्वारे साध्य करण्याचा प्रयत्न चालू आहे. जरी औषधांना प्रतिसाद देणारा क्षयरोगाचा उपचार शासनामार्फत मोफत होत असला, तरी बहुऔषध-प्रतिकारक क्षयरोगाचा उपचार खर्चिक आहे.

प्रतिबंध : रुग्णाकडून इतरांना सूक्ष्मजंतुसंसर्ग होऊ नये, म्हणून त्याने खोकताना व शिंकताना नेहमी रुमाल वापरणे आवश्यक असते. तसेच काहीदिवस रुग्णास इतरांपासून दूर ठेवणे उपयुक्त असते, परंतु ते नेहमीच शक्य नसते. त्यामुळे ज्यांच्या थुंकीत सूक्ष्मजंतूंचे प्रमाण जास्त आहे अशा(उघड्या) व्यक्तींच्या कुटुंबांतील इतरांना काही दिवस आयसोनियाझिडया औषधाची उपचारापेक्षा कमी मात्रा रोज देता येते. तीन औषधांपेक्षा अधिक दिलेल्या उपचारांनी २–४ आठवड्यांत संसर्गजन्यता नाहीशी होऊ शकते. रुग्णांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी जंबुपार किरणांचे स्रोत बसविणे काही ठिकाणी अंमलात आणले जाते.

क्षयरोगप्रतिबंधक लशीचा शोध लेआँ शार्ल आल्बेर कालमेट आणि कामीय गेरँ या फ्रेंच संशोधकांनी १९०८ मध्ये लावला. या लशीची परिणामकारकता तसेच दुष्परिणाम याविषयी अनेक वर्षे वादविवाद झाले. सध्या क्षयरोगाची शक्यता असलेल्या देशांमध्ये नवजात अर्भकांनाही लस दिली जाते. बॅसिलस कालमेट गेरँ (बीसीजी) या नावाचे जिवंत, परंतु रोगनिर्मिती क्षमता नसलेले सूक्ष्मजंतू या लशीत असतात. लस त्वचेत टोचल्यावर तेथे (बहुतेक वेळा खांद्याच्या येथे) सूज येऊन फोड निर्माण होतो. काही दिवसांनी तो बरा होतो. तोपर्यंत क्षयरोगाविरुध्द प्रतिपिंडांचीनिर्मिती झालेली असते. ही प्रतिकारशक्ती दीर्घकाळ टिकते. यूरोपमधील १९२४ पासून प्रारंभ झालेल्या या लशींचा अनुभव १९५६ अखेर पुनर्मूल्यमापनानंतर पाश्चात्त्य देशांनी स्वीकारला. मुख्यतः विकसनशील देशांत सध्या तिचा वापर होत आहे. लशीतील सूक्ष्मजंतू मा. बोव्हीसया प्रकारचे असतात.

क्षयरोगनियंत्रण व भारतातील स्थिती : एकोणिसाव्या शतकात औद्योगिक क्रांतीच्या प्रगतीबरोबरच क्षयरोगाच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली. यूरोपमध्ये अशा रुग्णांना विश्रांती मिळून ताप थांबेपर्यंत मोकळ्या हवेचा लाभ व्हावा म्हणून पहिला आरोग्याश्रम (सॅनटोरिअम) १८५९मध्ये सायलीशियात (पूर्व जर्मनीचा भाग) हेर्मान ब्रेमर यांनी काढला. इतर देशांमध्येही त्या प्रकारचे आश्रम, झोपड्या आणि वसाहती निर्माण होऊ लागल्या. क्षयरुग्णांसाठी विशेष दवाखानेही निघाले. इंग्लंडमध्ये १९११ मध्ये रुग्णांची माहिती आरोग्याधिकाऱ्यास दिलीच पाहिजे, असा कायदा झाला. विशेष प्रशिक्षण घेतलेल्या परिचारिका रुग्णाच्या घरी जाऊन तेथील स्थिती पाहून कुटुंबियांना भेटू लागल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांवरउपचाराची जबाबदारी टाकण्यात आली. या सर्व उपायांमुळे क्षयरोगाच्या प्रसारावर काही अंशी नियंत्रण आले. ब्रिटनसारख्याच काही उपाययोजना ब्रिटनशासित हिंदुस्थानातही अंमलात येऊ लागल्या. तरीही येथील क्षयरोगाचे प्रमाण दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस प्रभावी औषधे मिळेपर्यंत फारसे सुधारले नाही.

ब्रिटिशशासित हिंदुस्थानात १९२०-२१ या काळात दरवर्षी एक लाख लोकसंख्येमागे क्षयरोगाने सु. ४०० मृत्यू ओढवत. १९५०-५१ मध्येहे प्रमाण सु. २०० वर आले आणि १९६४ मध्ये ते सरासरी १००पर्यंत कमी झाले. तरीही सार्वजनिक आरोग्याची मोठी समस्या म्हणून क्षयरोगाचा प्रश्न भेडसावत राहिला. जागतिक पातळीवर २००७ मध्येसु. १३.७ दशलक्ष रुग्ण आढळले. २०१० मध्ये ८.८ दशलक्ष नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले व १.४५ दशलक्ष रुग्णांचा मृत्यू झाला.मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ०.३५ दशलक्ष मृत्यू एचआयव्ही संसर्गामुळे झाल्याचे आढळले. भारतात १९९० च्या सुमारास जगातील एकूण क्षय रुग्णांपैकी २० प्रतिशत रुग्ण असावेत, असा अंदाज आहे. काही आकडेवारींनुसार एकूण संसर्गजनक रुग्णांची संख्या त्या वेळी ८.७ लक्ष होती. दरवर्षी सु. २० लक्ष नवीन रुग्णांना संसर्ग होत असे आणि जवळपास ३,३०,००० रुग्ण क्षयरोगाला बळी पडत होते. १९९३ मध्ये सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला. त्यात डॉट्स पद्धतीने औषधे देण्यास प्रारंभ झाला. १९९७ मध्ये व पुन्हा २००५ मध्ये या कार्यक्रमांमध्ये आवश्यक ते फेरफार करण्यात आले. २००६ मध्ये भारताच्या सु. ६३३ जिल्ह्यांमध्ये १११ कोटी लोकसंख्येपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला. सु. १२,००० उच्च दर्जाची सूक्ष्मदर्शक केंद्रे आणि केंद्र ते परिघीय संस्था अशा ५ विविध पातळ्यांवर तो राबविला जातो. बहुऔषधप्रतिकारक रुग्णांना योग्य ती पर्यायी औषधे देऊन त्वरित रोगनियंत्रण करण्याचे उद्दिष्ट लवकरच साध्य होईल, अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना (NACO), जागतिक आरोग्य संघटना, स्वयंसेवी संस्था (NGO’s), खाजगी रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये या सर्वांच्या सहकार्याने क्षयरोगनियंत्रणाचे कार्यक्रम अंमलात येतात. एखाद्या देशातील वा प्रदेशातील क्षयरोग संसर्ग झालेल्या व्यक्तींचे प्रमाण त्या समाजाच्या सुस्थितीबद्दल कल्पना देणारा निर्देशक समजला जातो. कारण या सुस्थितीस हातभार लावणारे अनेक घटक क्षयरोगाच्या प्रतिबंधास मदत करतात. उदा., चांगल्या घरांची उपलब्धता, पोषक अन्न, शिक्षण, जीवन शैलीची गुणवत्ता, लग्नाचे वय ( योग्य वयातील विवाह), स्वत:ला होणाऱ्या आजाराबद्दलची जाणीव ( आरोग्य जाणीव) इत्यादी. त्यामुळे समाजकल्याणाच्या योजना या एक प्रकारे क्षयरोग प्रतिबंधाचा भागच असतात असे म्हणता येईल.

श्रोत्री, दि. शं.

आयुर्वेदीय चिकित्सा

आयुर्वेदात क्षयरोगाला राजयक्ष्मा असे म्हणतात. क्षयरोग म्हणजेज्यात दिवसेंदिवस शरीर क्षीण होत जाते शरीरक्षय हे ज्याचे मुख्यलक्षण असते तो रोग होय. अनेक रोग सहजासहजी होतील अशी शरीराची एक रोगावस्था होय. हा सुरू होण्याच्या आरंभी शरीराच्या कोणत्यातरी भागात ⇨ स्रोतसां चा अवरोध झालेला असतो. त्या अवरोधाच्या अवस्थेनुसार निरनिराळी चिन्हे उत्पन्न होतात. बरेच दिवस बारीक तापयेतो, अशक्तपणा दिवसेंदिवस वाढत जातो, वजन कमी होऊ लागते, काम करण्यास उत्साह वाटत नाही. अशा परिस्थितीत क्षयरोगाचीसमजली जाणारी जरी कोणतीही लक्षणे नसली, तरी क्षयरोग प्रतिबंधक अशी औषधे अवश्य घेतात.

क्षयरोगावरील औषधोपचारांत अनेक प्रकारची औषधे दिली आहेत परंतु या विकारावरील आनुभविक अशी ४–५ औषधे निरनिराळ्या अवस्थांत कशी घ्यावयाची याचे वर्णन पुढे दिले आहे.

च्यवनप्राश : हे औषध प्रसिद्ध आहे. अनेक वनस्पतींच्या काढ्यात आवळे शिजवून त्यात तेल, तूप, मध, खडीसाखर व काही औषधांचीचूर्णे मिसळून हा अवलेह तयार करतात. अष्टवर्ग म्हणून प्रसिद्ध असलेली आठ शक्तिवर्धक औषधे मिसळून केलेला च्यवनप्राश जास्त गुणकारीआहे. च्यवनप्राश हा क्षयासाठी सर्व ऋतूंत बहुतेक सर्व प्रकृतीच्यालोकांना मानवणारा आहे. क्षयरोगातील कोरडा खोकला, बारीक ताप, दररोज वाटत असणारा थकवा, मैथुनानंतर एकाएकी येणारा थकवा या लक्षणांवर दररोज सकाळी रिकाम्या पोटी व संध्याकाळी ४ वाजता प्रत्येकवेळी २-२ तोळे (१ तोळा = सु. ११.६६ ग्रॅम) च्यवनप्राश चावून चावून खावा व वर दूध प्यावे. दुधाचे प्रमाण २०–४० तोळे पचेलत्या प्रमाणाने असावे. सामान्यपणे २ महिने हे औषध सतत घेतल्यानेरोगी लक्षणमुक्त होईल. तसेच ज्या लोकांना क्षयप्रतिबंधक म्हणून या औषधाचा उपयोग करावयाचा असेल, त्यांनी दररोज सकाळी रिकाम्यापोटी २ तोळे च्यवनप्राश दुधाबरोबर घ्यावा. भूक लागल्यावर जेवावे. दुसऱ्या अगर तिसऱ्या दिवशी १-१ तोळा च्यवनप्राश वाढवावा. याप्रमाणे ७ दिवसाच्या शेवटी १० तोळ्यांपर्यंत प्रमाण वाढवावे. पचेल त्या मानाने दुधाचे प्रमाण वाढवावे, असेच प्रत्येक सप्ताहाला कमी करत आणावे.असा हा आरोह-अवरोहयुक्त क्रम हेमंत व शिशिर ऋतूंत घ्यावा. याने शरीराची झीज थांबेल, रोगप्रतिकारक्षमता वाढेल, सर्व अवयवांची व इंद्रियांची शक्ती वाढेल, म्हातारपण उशिरा येईल, दीर्घायुष्य प्राप्त होईल. च्यवनप्राश क्षय व्याधीत प्रथमावस्थेत जितका उपयोगी आहे, तितका तो द्वितीय व तृतीय अवस्थांत उपयोगी नाही. त्या अवस्थांमध्ये अनेक औषधांचा ⇨ अनुपानासाठी उपयोग केला जातो. लहान मुले, वृद्धमाणसे, तरुण स्त्रिया-पुरुष, श्रमजीवी, बुद्धिजीवी अशा सर्व तर्‍हेच्या लोकांना कोठल्याही दुसऱ्या उपचाराबरोबर ह्या औषधांचा उपयोग होतो.[→ च्यवनप्राश].

आरोग्यवर्धिनी : हे औषध अभ्रक, लोह, ताम्र, शिलाजित, त्रिफळा, कडुलिंबाच्या रसाच्या भावना दिलेले असे राजयक्ष्मा यावरील परिपूरकअसे आहे. विशेषतः ज्या राजयक्ष्म्यामध्ये पहाटे घाम येतो, सततबारीक ताप असतो, अंग दुखते, अशक्तपणा असतो, डोके दुखते, हाता-पायांची व डोळ्यांची आग होते, सुस्ती फार असते, अग्निमांद्य बरेच असते, मलावरोध असतो. त्याप्रमाणे क्षयाच्या सुरुवातीची लक्षणे असताना हे औषध ४-८ गुंजा (१ गुंज = सु. ०.१२० ग्रॅम) सकाळ-संध्याकाळ दुधाबरोबर देतात. प्रकृतिमानाप्रमाणे मध, मोरावळा, तूप ही अनुपानेयोजतात. हे औषध घेत असताना दूध हाच मुख्य आहार ठेवतात.अगदी थोडासा दूध भात घेतात. फार श्रम करीत नाहीत. या औषधानेसुरुवातीला क्वचित प्रसंगी प्रथम १-२ वेळा जुलाब होतात. २-४ दिवसांनी हे जुलाब थांबतात. ह्या औषधाने शरीरातील स्रोतसे मोकळी होत असताना प्रथम शरीरामध्ये थोडीशी उष्णता वाढते, हलकेपणा येतो व वजनकमी होते यांमुळे बऱ्याच वेळा रोग वाढतो आहे, असा भ्रम निर्माणहोतो परंतु स्रोतसे मोकळी झाल्याने भूक चांगली लागते. सुस्तीनाहीशी होते. शरीरातील झिजणारे घटक लवकर भरून यावयास लागतात. रोगप्रतिकारक्षमता अभ्रकासारख्या औषधाने निर्माण व्हावयास लागते. रोगी आरोग्ययुक्त पूर्वस्थितीला येतो.

सुवर्ण मालिनी वसंत : हे औषध क्षयरोगावरील अनन्य साधारण औषध म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या औषधात सोने, मोती, हिंगूळ व कळखापरी ही शरीराला पुष्टी देणारी औषधे प्रथम लोणी घालून खलबत्त्यात खूप खलली जातात. लोण्यातील सर्व स्निग्धता या द्रव्यांशी एकरूप झाल्यावर लिंबाच्या रसाच्या भावना देतात. याने लोण्यातील ओशटपणा नाहीसाहोऊन विशिष्ट रासायनिक शक्ती उत्पन्न होते. औषध दीर्घकाळ टिकणारे होते. औषधीकरणातील खल्वी रसायन या औषधी द्रव्याला जुनेपणाची आवश्यकता शास्त्रात वर्णन केली आहे. लोणी हा स्वभावतः दीर्घकाळ खराब न होता टिकणारा पदार्थ नाही. लिंबाच्या रसाच्या संयोगामुळेदीर्घकाळ टिकाऊपणा त्यात उत्पन्न होतो. हे औषध ज्या राजयक्ष्म्यामध्ये दररोज शरीराची झीज होऊन थकवा येतो, थोडेसे चालले असता दम लागतो, फिकेपणा फार आलेला असतो, घशाशी चिकटा फार येतो, डबडबलेला खोकला असतो, शिवाय बारीक ताप, हात, पाय, डोळे ह्यांची जळजळ, मैथुनजन्य थकवा, वजनात कमालीची होणारी घट ही लक्षणे असतात, त्यावेळेस देतात. सुवर्ण मालिनी वसंत १ ते २ गुंज, पिंपळी चूर्ण ४ गुंज एक चमचाभर मधात चाटवावे व वर दूध प्यावे. जमल्यास दुधाला बदाम, वेलची, चारोळी, पिस्ते, केशर यांचा मसाला लावून ते दूध प्यावे. हे औषध साधारणपणे २ महिने घेतल्याने मुख्यतः शरीरघटकांची झीज कमी होऊन वजन घटण्याचे प्रमाण कमी होते. शरीराला आलेला निस्तेजपणा, भकासपणा हे सर्व कमी होऊन तेज वाढते. कोठल्याही ऋतूत हे औषध घ्यावयास हरकत नाही तथापि, सहसा पावसाळ्यात व हिवाळ्यात याचा उपयोग करतात. 


शिलाजतुवटी : शरीरातील शुक्रधातू क्षीण झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या राजयक्ष्म्यावर शिलाजतुवटी फार गुणकारी आहे. शुक्रक्षीणतेने येणारा फिकेपणा, ओजाचा नाश, येणारा भित्रेपणा, उदासीनता, दुबळेपणा, जीवना-बद्दल वाटत असणारी नैराश्याची भूमिका ही सर्व लक्षणे शुक्र, ओज, स्नेह ह्यांची क्षयदर्शक आहेत. स्वभावातील चंचलता, बारीक ताप, किंबहुना कोणतेही राजयक्ष्म्याचे लक्षण आहे असे भासवणारा रोगी शिलाजतुवटीने बरा होतो. साधारणपणे ४-८ गुंजा शिलाजतुवटी दुधात विरघळून दिवसातून २ वेळा घेतात. हे औषध घेत असताना पचेल असा स्निग्ध आहार, गोड फळे, सुकामेवा, विश्रांती यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. मैथुन वर्ज्य करतात. साधारणपणे हे औषध सुरू केल्यावर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात स्वप्नावस्था निर्माण झाली की, हे औषध लागू पडले आहे, असे समजतात. याप्रमाणे ८ आठवडे सतत उपचार केल्याने बराचसा फायदा होतो.

सुवर्णपर्पटी : राजयक्ष्म्यामध्ये पुष्कळ वेळा समान वायूच्या कार्यकारित्वाची ग्रहणीस्थानी येणारी प्रचीती म्हणजे सार-किट्ट विभाजन क्रिया होय. ग्रहणी अवयव व तदाश्रयी वायू ह्यांच्या अबलत्वाने नष्टहोते. अशा वेळी ग्रहणी अवयवासह सर्व महास्रोतसाला बल देणारा असा सिद्धौषधी योग सुवर्णपर्पटी आहे. राजयक्ष्म्यामध्ये वेगावरोधामुळे उदर शूळ सुरू होतो, अकस्मात पातळ शौचास होते. त्यामध्ये बऱ्याच वेळी आवही असते आणि जुलाब होताच क्षणी शरीराला थकवा येतो, घशाला कोरड पडते, अग्निमांद्य बेताचे असते, खाण्यापिण्यावरील इच्छा कमी होत नाही. मात्र, अन्नाचे प्रमाण थोडेसे अधिक झाले, तर आतड्यास गुरगुरते व पोट दुखून शौचाला होते. राजयक्ष्म्यामध्ये शरीरावर होणारा परिणाम पुढील तीन ठिकाणी पाहावयास मिळतो : (१) आतडी, (२) सांधे, (३) फुप्फुसे. या तीनही ठिकाणी गेलेले बल परत येण्यास सुवर्णपर्पटीचा उपयोग चांगला होतो. सुवर्णपर्पटी २ गुंजा बारीक करून तूप साखरेतून सकाळ-संध्याकाळ देतात. ज्यांना अम्लपित्ताचा त्रास असेल त्यांना २ गुंजा सुवर्णपर्पटी व ४ गुंजा शौतिकभस्म देतात. ज्यांची चव कमी झाली असेल अशांना सैंधव सुवर्णपर्पटीबरोबर तुपातून देतात. सुवर्णपर्पटी चालू असताना आहारामध्ये दूध व भात, तूप आणि भात, तूप व चपाती, उकडलेल्या भाज्या, गोड लोण्यासकट ताक हे देतात. साधारण हे औषध प्रथम २ महिने देतात. काही काळ थांबवून अधूनमधून देत राहतात. साधारणपणे वर्षभर हा उपचार केल्याने रोगी बराचसा सुधारतो.

जोशी, वेणीमाधवशास्त्री

पशुवैद्यक

क्षयरोग पुरातन काळापासून कुप्रसिद्ध असलेला जुनाट स्वरूपाचा, अतिशय रेंगाळत राहणारा संसर्गजन्य रोग असून तो मानव आणि पशूंत आढळतो. मायकोबॅक्टिरियम नावाच्या क्षयरोगाच्या सूक्ष्मजंतूमुळेहोणाऱ्या या रोगात शरीराच्या एका विशिष्ट भागात सूक्ष्म गाठी निर्माण होतात व त्या वाढत जाऊन सर्व शरीरभर पसरतात. गाठीतून चिकटघट्ट स्राव निघतो व पुढे त्यात कॅल्शियम साठून तेथील ऊतक नष्टहोते. गाठी फार वाढल्या म्हणजे द्राक्षासारख्या दिसतात, म्हणून इंग्रजीतया रोगाला ‘ग्रेप्स’ म्हणतात. पुरातन काळी त्याला ‘थायसीस’ म्हणत असत. थायसीस हा ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ क्षय किंवा र्‍हासअसाच आहे. त्यानंतर रोगात दिसणाऱ्या क्षयरोगाच्या गाठीवरून त्याला ‘ट्युबरक्युलॉसिस’ असे नाव पडले. १८८२ मध्ये ⇨ रॉबर्ट (रोबेर्ट) कॉख यांनी क्षयरोगाचे सूक्ष्मजंतू शोधून काढल्यामुळे या जुनाट रोगाचीकारणमीमांसा स्पष्ट करता येऊ लागली. क्षयरोग संसर्गजन्य असल्यामुळे पशूंना होणाऱ्या प्रकारामध्ये त्या प्राण्यापासून मिळणारे दूध किंवा मांसदूषित होऊन त्यामुळे माणसांना रोग होण्याची चिंता उत्पन्न झाली. त्यामुळे रोगाचा अभ्यास विशेष केला गेला व त्याचे महत्त्व सिद्ध झाले आहे.

सर्व उष्ण-रक्ताच्या प्राण्यांत रोग होतो. रोगाचे सूक्ष्मजंतू हे क्षयरोगाचे सूक्ष्मजंतू या नावाने सर्वसाधारणपणे ओळखले जात असले, तरी त्याततीन उपजाती आहेत. माणसामध्ये क्षयरोग उत्पन्न करणारे बहुधा माणसातच रोग उत्पन्न करतात परंतु क्वचित कुत्र्यांमध्ये रोग निर्माण करतात. दुसऱ्या प्रकारचे बहुधा कोंबड्यांत व इतर पाळीव पक्ष्यांत क्षयरोग निर्माणकरतात परंतु क्वचित डुकरांत व मेंढ्यांतही या प्रकारच्या सूक्ष्मजंतूंमुळे क्षयरोग होतो. तिसऱ्या प्रकारचे सूक्ष्मजंतू गायी-म्हशी, घोडे, मेंढ्या, बकऱ्या, कुत्री व मांजरे यांच्यात क्षयरोग निर्माण करू शकतात परंतु माणसांनासुद्धा या प्रकारच्या सूक्ष्मजंतूंमुळे क्षयरोगाची बाधा होऊ शकते, ही गोष्ट विशेष महत्त्वाची आहे. क्षयरोगी गुरांचे दूध, मांस यांच्याखाण्यामुळे व त्यांच्या सहवासात राहिल्याने माणसांनाही हा रोगहोण्याची भीती असते.

क्षयरोगाचे स्वरूप : हे सूक्ष्मजंतू बहुधा दूषित प्राण्यांच्याशरीरातच वाढतात. ते निसर्गात दुसरीकडे कोठेही वाढत नाहीत. ते स्वतःभोवती बीजुक निर्माण करणारे नसले, तरी ते उष्णता व पुष्कळ जंतुनाशकांना लवकर दाद देत नाहीत. रोगी जनावराच्या शेणातून किंवा श्वसनातून बाहेर पडलेले सूक्ष्म जंतू दमट व थोड्याशा उष्ण जागी पुष्कळ दिवस जिवंत राहू शकतात व संधी मिळताच निरोगी जनावराच्या शरीरात प्रवेश करून रोग निर्माण करतात. रोगी जनावराच्या शेणातून, उच्छ्वासा-तून, दुधातून, मूत्रातून, योनिमार्गाने, गर्भाशयाच्या स्रावातून व उघड्या झालेल्या ग्रंथीतून सूक्ष्मजंतू बाहेर पडतात. शेणात सापडणारे रोगजंतू एकतर आतड्यातील रोगाच्या गाठीमुळे असतात किंवा छातीच्या क्षयरोगातील सूक्ष्मजंतू कफाबरोबर गिळल्यामुळे असतात. निरोगी जनावरे रोगी जनावराच्या सान्निध्यात असली तर रोग्यांच्या उच्छ्वासाबरोबर बाहेर हवेत फेकलेले रोगजंतू श्वसनाद्वारे निरोगी जनावराच्या शरीरात शिरून रोग पसरवितात. विशेष कोंदट जागी दाटीवाटीने गुरे बांधली असली किंवा वासरे कोंडलेली असली, तर अशा रीतीने रोगाचा संसर्ग संभवतो. दूषित चारा-दाणा-पाणी किंवा दूषित कुरणे यामधून रोग जास्त लवकर पसरतो. रोगी गायीचे दूध पिल्याने वासरांत नेहमी क्षयरोग पसरतो, तसाच तो लहान मुलांना होण्याचीही भीती असते. क्वचित दूषित योनिमार्गाच्या स्रावामुळे प्रजननाच्या वेळी वळूत (सांडात) रोग आढळतो. जास्त दूध देणाऱ्या गायीत यंत्राने दूध काढण्याच्या पद्धतीत यंत्रे एखाद्या क्षयरोगी गायीमुळे दूषित झाली, तर रोग निरोगी गायीतही पसरू शकतो. स्तनांत घालावयाच्या पोकळ नळ्या अस्वच्छ असतील, तर त्यामुळे रोग पसरतो. दूषित जनावराचे मांस खाल्यामुळे माणसांना रोग होण्याची भीती असते, म्हणून मांसासाठी मारलेल्या पशूंची कत्तलखान्यांत कसून परीक्षा करतात. व्यापारी पद्धतीच्या दुग्धालयातून दूध नेहमी उकळून विकले जाते व पाश्चात्त्य देशांत गायीची ‘ट्युबरक्युलीन’ लशींनी परीक्षा करून फक्त निरोगी गायीचे दूध उपयोगात आणतात. 

क्षयरोगाचे सूक्ष्मजंतू शरीरात शिरले म्हणजे प्रवेश केलेल्या जागी रोगाच्या सूक्ष्म गाठी निर्माण करतात. जनावराची प्रतिकारशक्ती व उत्तम निकोप प्रकृती यांमुळे रोगजंतू शरीरात प्रवेश मिळूनही गाठी होऊशकत नाहीत व काही लक्षणे न दाखविता शरीरात फक्त वास्तव्य करून राहतात परंतु काही कारणाने प्रकृती ढासळली व अशक्तता आली, तरते जोर करून रोगाची लक्षणे निर्माण करतात. रोगजंतूंनी शरीरात प्रवेश मिळविल्यानंतर ते अंतस्त्वचेवर किंवा लसीकांच्या ग्रंथीमध्ये वाढतात, दाह करतात व हळूहळू क्षयरोग गाठी निर्माण करतात. अशा गाठींमध्ये पिवळ्या रंगाचा स्राव किंवा पू झालेला असतो. कोणत्याही मार्गाने प्रवेश मिळविल्यानंतर रोग सर्व शरीरात पसरण्यास उशीर लागत नाही. श्वसनाच्या मार्गाने प्रवेश केलेले सूक्ष्मजंतू श्वसन मार्गात रोगाच्या गाठी निर्माणकरतात आणि तेथून खोकल्याच्या वेळी निघणाऱ्या कफातील सूक्ष्मजंतू पोटात कफ गिळल्याने पोहोचतात. त्यांपैकी काही प्रमाणात जठरातीलतीव्र रसाने नष्ट होतात, परंतु काही जठराच्या अंतस्त्वचेवर वास्तव्यकरून तेथे रोगाच्या गाठी निर्माण करतात. काही आतड्यापर्यंत पोहोचून तेथील अंतस्त्वचेवर रोगाच्या गाठी निर्माण करतात. काही लसीकातून, आतड्याच्या लसीका ग्रंथीवर व काही पोटाच्या पोकळीतील पडद्यावररोग निर्माण करतात. काही यकृताकडे धाव घेऊन त्याचा क्षयरोग निर्माण करतात, तर काही सूक्ष्मजंतू कोठेच थारा न मिळाल्यामुळे शेणातूनबाहेर पडतात.

रोगाच्या सूक्ष्मजंतूंपासून निघणारी विषे शरीरात भिनल्यामुळे जनावर जर्जर होऊन दुर्बल होत जाते. तसेच शरीरातील निरनिराळ्या इंद्रियां-वरील व घटकांवरील रोगाच्या गाठींमुळे भार पडून त्या इंद्रियाच्या व सभोवतालच्या इतर इंद्रियांच्या नैसर्गिक कार्यात व्यत्यय येतो. असेअसले, तरी हे कार्य अतिमंद गतीने रेंगाळत चाललेले असल्यामुळे क्षयरोगाची भावना लक्षात येण्यास फारच उशीर लागतो व रोगनिदानलवकर होत नाही. प्रथम स्वरूपाच्या लक्षणांत कधी थांबून थांबूनयेणारा खोकला, गिळण्याच्या वेळी होणारा त्रास, मधून मधून ताप वजनावर कृश होत जाणे ही लक्षणे दिसतात. गायी-म्हशीच्या श्वसनाच्या मार्गातील गाठींमुळे होणाऱ्या रोगात जुनाट स्वरूपाचा खोकला पुष्कळ दिवस येतो. तो पुष्कळ मोठ्याने किंवा जास्त वेळ उमाळी आल्यासारखा नसून सौम्य स्वरूपाचा, दिवसातून कधीतरी, विशेषत: थंडीत व सकाळच्या वेळी येतो. स्वरयंत्राच्या वर दाबले असता व व्यायामानंतर तो वाढतो. क्षयरोगाच्या गाठी फुप्फुसावर जास्त प्रमाणात वाढल्या की, श्वसनासाठी जास्त धडपड करावी लागते व खोल श्वास घेण्याचा जनावर प्रयत्न करते व त्यास गुदमरल्यासारखे होते. विशेषतः घशाच्या भागावर व श्वसन नलिकेवर रोगाच्या गाठी वाढल्या की, श्वसन नलिकेची पोकळी गाठीच्या वाढीमुळे कमी होऊन श्वसनात अडथळा होतो. अशा वेळी छातीची वैद्यकीय परीक्षा करून रोगाचे निदान करतात. जनावर खोकताना त्याच्या तोंडातून पिवळट पांढऱ्या रंगाचा कफ निघतो व तो कधीकधी जमिनीवर सांडलेला दिसतो परंतु बहुतेक वेळी गिळला जातो. जनावर चारा-दाणा कमीखाते, तर कधी तसाच टाकून देते. तोंडातील, नाकातील व डोळ्यांतील अंतस्त्वचा फिकट पांढरी दिसते. त्वचेचा लवचिकपणा नष्ट होऊन ती शरीराला घट्ट चिकटल्यासारखी दिसते. डोळ्यांतील तेज कमी होते, डोळे खोल गेलेले व निस्तेज दिसतात व चर्या दीनवाणी दिसते. रोग जसा वाढत जातो तसा खोकला जास्त होतो, श्वसन कष्टमय होते व जनावर मानखाली घालून स्वस्थ उभे राहते, जागेवरून हलत नाही, कृश होत जाते, शेवटी अशक्तपणामुळे उभे राहणे अशक्य होऊन खाली पडून राहते व मरते.

आतड्यावर रोगाच्या गाठींची वाढ झाल्यामुळे अन्नरस शोषणाचेकार्य स्थगित होऊन क्वचित आतड्यावर त्या सूक्ष्मजंतूंमुळे सूज येऊन अतिसार होतो व जनावर कृश होत जाते. यकृतावरील गाठीमुळे त्याच्या कार्यात अडथळा येतो. गायी-म्हशींना होणारा स्तनाचा क्षयरोग विशेष महत्त्वाचा मानला पाहिजे, कारण त्यांच्यापासून मिळणाऱ्या दूषित दुधामुळे रोगाचा प्रसार होतो. स्तनाचा क्षयरोग अत्यंत सावकाश वाढत असल्यामुळे विशेष लक्षणे दिसत नाहीत, परंतु रोग जसा वाढत जातो व स्तनांत गाठी जशा वाढत जातात तसे स्तन जड व कठीण बनतात. गाठी वाढून लवचिकपणा कमी झाल्यामुळे, पूर्णपणे दूध काढल्यानंतरही स्तन चिंबलेले दिसत नाहीत. कासेवर दाबून पाहिल्यास कठीणपणा लक्षात येतो व गाठी असल्यास त्या हातास जाणवतात. स्तनाचा एकच भाग दूषित झाला असेल, तर भागांतील फरक चटकन लक्षात येतो. आचळ सुजलेलेनसतात व दाबून पाहताना वेदनाही होत नाहीत परंतु दूषित भागाचा टणकपणा व गाठी हाताला जाणवतात.

यकृत, प्लीहा व मूत्रपिंडावर क्षयरोगाच्या गाठी झाल्या, तरी त्याअत्यंत जास्त प्रमाणात असल्याशिवाय त्या त्या इंद्रियाचे कार्य बरेचदिवस व्यवस्थितपणे चालू असते. रोग इतका रेंगाळणारा आहे की, क्षयरोगाच्या गाठींची इंद्रियांनाही हळूहळू सवय झाल्यासारखी होते व त्यांच्यातील प्रतिकारशक्ती सवयीने जास्त जागृत होते, परंतु गाठी जास्त प्रमाणात वाढल्या की, इंद्रियाची कार्ये स्थगित होऊन मृत्यूच ओढवतो. मध्यवर्ती तंत्रिका तंत्रावर (मज्जासंस्थेवर) रोगजंतूंनी वास्तव्य केले की, अत्यंत कार्यक्षम कोमल इंद्रियांच्या कार्यांत व्यत्यय येतो व रोगाच्या गाठी मेंदूच्या आतील भागावर किंवा पृष्ठभागावर, मागील किंवा पुढील बाजूस ज्या संवेदन केंद्रावर असतील त्याप्रमाणे त्या त्या कार्यात अडथळा येतो. तंत्रिका तंतूंवर (मज्जातंतूंवर) क्षयरोगाच्या सूक्ष्मजंतूंनी वास्तव्य केले, तर पुढील प्रकारची तंत्रिका तंतूच्या कार्यात व्यत्यय आणणारी लक्षणे दिसतात : मूर्च्छा येणे, स्नायूचे शीघ्र कंपन सुरू होणे, चेतनाहीनता प्राप्त होणे, दृष्टी अधू होणे, अंधत्व येणे इत्यादी. क्षयरोगाचे सूक्ष्मजंतू हाडा-सारख्या कठीण भागावरही वास्तव्य करतात. विशेषतः सांध्यांच्या ठिकाणी ते हळूहळू वाढत जाऊन, सांधे सुजतात व त्यांत वेदना सुरू होतात. ही क्रिया इतकी सावकाश चालू असते की, हाडाच्या क्षयरोगाचे निदानजिवंत प्राण्यांत करणे जवळजवळ अशक्यच असते, तरीही सांध्यात वेदना होऊन जनावर लंगडू लागले व नेहमीच्या सर्व उपायांनी आराम वाटला नाही म्हणजे क्षयरोगाचा संशय पक्का होतो. क्षयरोग क्वचित त्वचेवरही होतो. यामध्ये कठीण गुल्मे दिसतात ती कधीकधी आपोआप फुटतात किंवा अपघातामुळे फुटून त्यातून चिकट, सरबरीत स्राव निघतो. अशा रीतीने फुटलेली गुल्मे त्वचेवर व्रण निर्माण करतात व ती नेहमीच्या उपायांनी बरी न होता सतत चिघळत जातात. क्षयरोग रेंगाळणारा असला तरी एखादे वेळी रक्तातील क्षयरोगाच्या सूक्ष्मजंतूंचे अभिसरण सुरू होऊन एकदम उग्रस्वरूप धारण करतो. अशा वेळी शरीरात पुष्कळ ठिकाणी फोड येतात, विशेषतः ते फुप्फुसात जास्त दिसून येतात. जनावराला खूप ताप चढतो, श्वसन अवघड होते, नाडी तेज परंतु कमजोर होते, जनावर चारा खातनाही व ८–१० दिवसांत मृत्युमुखी पडते. क्षयरोग सूक्ष्मजंतूच्या उपजाती असून त्या निरनिराळ्या प्राण्यांतील क्षयरोगात दिसून येत असल्या तरीसर्व सूक्ष्मजंतूंमुळे रोग निर्माण होण्याची व तो पसरविण्याची पद्धतसारखीच असते. 

 पक्ष्यांना किंवा गायी-बैलांना होणाऱ्या रोगजंतूंच्या उपजातींमुळे डुकरां-मध्ये क्षयरोग होतो. त्यांच्यात सापडेल ते खाण्याची प्रवृत्ती असल्यामुळे बहुधा रोगाची बाधा पोटातून सूक्ष्मजंतू गेल्यामुळेच होते. क्षयरोगाच्या गाठी पोटातील पोकळीतील इंद्रियावरच दिसून येतात व हे सूक्ष्मजंतू गायी-म्हशींत रोग निर्माण करणाऱ्या उपजातीचे असतात. पक्ष्यांमध्ये रोग निर्माण करणारे सूक्ष्मजंतू बहुधा श्वसन मार्गावर रोगाच्या गाठी निर्माण करतात. प्लीहेतील सूक्ष्म गाठी गोल असतात व त्यांच्यात पोकळीसारखे भाग असून त्यांत पाणी भरलेले असते. बकऱ्यांना विशेषेकरून रोग होत नाही, परंतु गायी-म्हशींच्या सान्निध्यात त्या राहिल्या, तर स्तनाचा क्षयरोग कधीकधी झालेला दिसून येतो. मेंढ्यांत व बकऱ्यांत श्वसनाद्वारे रोग पसरून फुप्फुसाचा दाह किंवा शोथ (सूज) झालेला कधीकधी आढळतो. अशा वेळी खोकला असतो व श्वसन कष्टप्रद होते. घोड्यामध्ये क्षयरोग फार कमी प्रमाणात आढळतो. श्वसनाच्या मार्गात क्षय रोग झाल्यास खोकला आढळतो, परंतु बहुधा घोड्याच्या मानेच्या मणक्यावर क्षयरोगाचा परिणाम होऊन मान ताठ राहते, ती नीट वाकविता येत नाही व जमिनीवरील चारा-दाणा मान वाकवून खाता येत नाही. चांगला चारा-दाणा मिळूनही घोडा दुबळा होत जातो, तहान फार वाढते व लघवीस फार होते. कुत्र्यांत हा रोग विशेष रेंगाळणाऱ्या स्वरूपाचा नसतो व तीव्र लक्षणे आढळतात. फुप्फुस, यकृत व मूत्रपिंड यांवर रोगाच्या गाठी दिसून येतात. कुत्र्यांपासून मुलांना रोगाची बाधा होण्याची शक्यता असल्यामुळे रोगाचे निदान करून रोगी कुत्री ताबडतोब नष्ट करतात.

बहुतेक प्राण्यांत क्षयरोग रेंगाळणारा असल्यामुळे त्याची स्पष्ट चिन्हे लवकर दिसत नाहीत. त्यामुळे निदान करणे अत्यंत अवघड असते. पूर्वीच्या काळी रोगनिदान लवकर न झाल्यामुळे ते होईपर्यंत रोग बहुधा असाध्य अवस्थेतच पोहोचलेला असे. त्यामुळे ‘क्षयरोग म्हणजे मरण’ असेसमीकरण ठरून गेल्यासारखे होते परंतु प्राण्यांत रोगनिदान करण्यासाठी क्षयरोग-परीक्षण पद्धती शोधून काढण्यात आली व त्यामुळे रोगनिदान करण्यास बरीच मदत झालेली आहे. या पद्धतीचे मूळ १८९० मध्येरॉबर्ट कॉख यांनी शोधून काढलेल्या व प्रयोगशाळेत वाढविलेल्या रोग-जंतूच्या शोधात आहे. आता सूक्ष्मजंतू वाढविण्यासाठी एक खास प्रथिनापासून शुद्ध केलेला द्रव वापरतात व त्यामुळे परीक्षण पुष्कळअचूक होते. प्रयोगशाळेत सूक्ष्मजंतुहीन वातावरणात वाढविलेले रोगजंतू मारून त्यापासून या पद्धतीत लागणारी क्षयरोग-परीक्षण लस तयारकरतात व तिच्या साहाय्याने रोगनिदान करतात. प्रथम परीक्षण डोळ्यात लस घालून करीत असत. नंतर त्वचेखाली टोचून प्राण्यात झालेलीप्रक्रिया पाहून रोगनिदान करतात. क्षयरोग सूक्ष्मजंतू निरनिराळ्या उपजातीचे असल्यामुळे हल्ली पक्ष्यांमध्ये रोग निर्माण करणारे सूक्ष्मजंतू व सस्तन प्राण्यां-मध्ये रोग निर्माण करणारे सूक्ष्मजंतू यांपासून तयार केलेली परीक्षण लस एकाच वेळी दोन निरनिराळ्या ठिकाणी त्वचेत खास सुईने टोचतातव त्वचेवर आलेली सूज, त्वचेची जाडी मापून रेागनिदान ठरवितात. ही त्वचेवरील प्रक्रिया नेमकी कोणत्या स्वरूपाची असते हे निश्चित सांगतायेत नाही.

क्षयरोगाचा प्रतिबंध : क्षयरोगाचे सूक्ष्मजंतू निसर्गात फक्त रोग झालेल्या माणसांच्या किंवा जनावरांच्या शरीरातच वाढू शकतात, हीगोष्ट रोगाचा प्रतिबंध करताना विशेष लक्षात ठेवून रोगप्रतिबंधक उपायकेले पाहिजेत. त्या दृष्टीने रोग जनावरात झालेला असेल, तर परीक्षणपद्धतीद्वारा निदान करून अशी जनावरे त्यांच्यामुळे इतरांना रोग होऊनये म्हणून नष्ट करणे हिताचे आहे. पाश्चात्त्य देशांत परीक्षा करून रोगसिद्ध झाल्यावर तशी जनावरे नष्ट करतात परंतु भारतातील असे पशूनष्ट करण्याच्या बाबतीत पुष्कळ अडचणी आहेत. भावनाप्रधान लोकांनात्या पटणाऱ्या नाहीत. तरीही एकंदर पशुधनाच्या हिताच्या दृष्टीने क्षयरोगाचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी रोगी जनावरे नष्ट करणे आवश्यक आहे, हेसहज लक्षात येण्यासारखे आहे. रोगजंतूंना प्राण्यांच्या शरीरात वाढ करण्यासारखी अनुुकूल परिस्थिती प्राप्त झाली नाही, तर ते संपूर्ण नष्ट होतील. कारण त्यांना वाढण्यासाठी निसर्गात इतरत्र कोठेही वाव नसतो. रोगप्रतिबंधक लस रोग्यांच्या सान्निध्यात राहणाऱ्या प्राण्यांना टोचली, तर त्यांना क्षयरोगाची बाधा होणार नाही. मानव व पशुपक्षी यांच्यात उपयोगी क्षयरोग प्रतिबंधक बीसीजी लस तयार करण्यात आली आहे. ही लस गायी-म्हशींत रोग उत्पन्न करणाऱ्या उपजातीच्या क्षयरोग सूक्ष्मजंतूपासून तयार करतात. लशीतील रोगजंतू जिवंत असतात, परंतु निष्क्रिय केलेले असतात. रोगी गुरांच्या सान्निध्यात राहणाऱ्या किंवा रोगाचा विशेष उपद्रव होणाऱ्या जागी बांधलेल्या गुरांनाही लस टोचून बऱ्याच प्रमाणात रोगप्रति-बंधक क्षमता निर्माण करावी लागते. कारण एकदा क्षयरोगाचा प्रादुर्भाव झाला की, ही लस विशेष उपयोगी पडत नाही. गोठ्यातील स्वच्छता व साफसफाई रोगप्रतिबंधासाठी विशेष उपयोगी पडते. उघड्यावर मोकळ्या हवेत व डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या गुरांना क्षयरोग क्वचितच होतो. उलटपक्षी दाटीदाटीने बांधलेल्या जनावरांत तो विशेष आढळून येतो. रोगप्रतिबंधक उपाय करताना प्रत्येक जनावराला शास्त्रीय दृष्ट्या आवश्यक असलेली जागा, गोठ्यातील खेळती हवा व स्वच्छता याचे महत्त्व सहज लक्षात येईल. गोठे जंतुघ्न द्रावणाने दर आठ दिवसांनी धुणे आणि गव्हाणी, चारा-दाणा–पाणी ह्यांची भांडी स्वच्छ ठेवणे, शक्यतो शुद्ध पिण्याचे पाणी देणे यांवर विशेष लक्ष ठेवणे रोगप्रतिबंध कार्यात विशेष महत्त्वाचे ठरते. रोगप्रति-बंधक परीक्षण पद्धतीने दर सहा महिन्यांनी गुरे तपासून घेतात व रोगनिदान होताच रोगी गुरे कळपातून अलग करतात. शिवाय दूध व जनावराचे इतर स्राव प्रयोगशाळेत तपासून पाहतात. विशेषतः दुधामार्फत अर्भकांना क्षयरोगहोण्याची शक्यता असल्यामुळे दुग्धालयातील जनावरे क्षयरोगापासून मुक्त आहेत, याची विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, डेन्मार्क, ग्रेट ब्रिटन वगैरे प्रगत देशांत रोगमुक्त कळप नोंदविले जातात व अशा दाखला मिळालेल्या कळपातील दुधाचा वापर निश्चितपणे केला जातो. 

क्षयरोग झाल्यानंतर उपचार करणे, हे जनावरांच्या बाबतीत विशेषफायद्याचे नाही. कारण दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या क्षयरोगाचे निदान होण्याच्यापूर्वीच किती तरी दिवस आधी रोगजंतू शरीरात ठाण मांडून बसलेलेअसतात व आपले कार्य करीतच असतात. दुसरे असे की, कितीही काळजी घेतली तरी रोग्यांच्या संसर्गाने रोग इतर जनावरांत पसरण्याचा धोकाराहतोच. शिवाय क्षयरोग मानवांनाही होण्याची भीती असते. आर्थिकदृष्ट्या रोगी जनावर परवडण्यासारखे नसते व मानवतेच्या दृष्टिकोनातूनपाहिले, तरी उपचार फायदेशीर नसल्यामुळे जनावराचे होत असलेले हाल पाहणे कोणालाही आवडणार नाही. पाश्चात्त्य देशांत रोगाच्या भावनेचे निदान होताच जनावरांना कत्तलखान्यात पाठवितात व तज्ञ पशुचिकित्सकांकडून परीक्षा करून दूषित मांस व इतर अवयव नष्ट करून इतर मांस वगैरे उपयोगात आणतात परंतु भारतात प्रत्येक ठिकाणी अनेक कारणांमुळेतेही शक्य नसते. अशा वेळी (शास्त्रीय पद्धतीने) वेदना होऊ न देतापशूंना नष्ट करणे व रोगजंतूचा नाश करणे एवढाच उपाय शिल्लक राहतो.

 


Popular posts from this blog

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर येथे 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

   पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार विजय देशमुख, आमदार रणजीत मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सह संचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते. उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढावी यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे , असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलन...

मंथली विजयप्रताप जुलै २०२५ अंक

परिवहन मंत्री सरनाईक दररोजचा क्याश किती होते ते महामंडळाच्या डयाश बोर्डवर प्रकाशित करा ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर करिता बस आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली

मुंबई , दि. ११ : आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी   परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली   आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे , अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर   येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.   मंत्री श्री. सरनाईक म्हणाले , विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूर ला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधाव...