Skip to main content

राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री.एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील बार्शी रोडवरील हातलाई मंगल कार्यालयात शिवसेनेचा भव्य मेळावा



धाराशिव - राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री.एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील बार्शी रोडवरील हातलाई मंगल कार्यालयात शिवसेनेचा भव्य मेळावा शनिवार,दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात धाराशिव -कळंब विधानसभा मतदारसंघातील शाखांचे प्रातिनिधिक स्वरूपात फलक पूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी केले आहे.
मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे शनिवारी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील बार्शी रोडवरील हातलाई मंगल कार्यालयात शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. सुधीर पाटील यांनी गेल्या महिन्यातच शिवसेनेत प्रवेश केला असून, त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर जिल्हा संघटकपदाची जबाबदारी सोपवली आहे. सुधीर पाटील यांनी शिवसेना पक्षाच्या संघटन वाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी महिनाभरात धाराशिव -कळंब विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांना भेटी देऊन पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी जोर लावला आहे.त्यांच्या प्रयत्नांमुळे पक्षाला पुन्हा एकदा ताकद मिळत आहे. त्यांच्या पुढाकारातून धाराशिव येथे शनिवारी दुपारी 2 वाजता शिवसेना पक्षाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे तसेच धाराशिव -कळंब विधानसभा मतदारसंघातील विविध गावातील 190 शाखांचे उद्घाटन प्रातिनिधिक स्वरूपात फलक पूजन करून मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी विविध पक्षातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षाचे नेते तथा पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सूरज साळुंके, दत्ताअण्णा साळुंके, मोहन पणुरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना पक्षाच्या विविध शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी केले आहे.
स्वतंत्र्यसैनिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार,
17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. या लढ्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाडा मुक्ती दिनाच्या लढ्यात आपले रक्त सांडले तसेच बलिदानही दिले. या मराठवाडा स्वातंत्र्य संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या शनिवारी होणाऱ्या मेळाव्यात जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Popular posts from this blog

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर येथे 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

   पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार विजय देशमुख, आमदार रणजीत मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सह संचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते. उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढावी यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे , असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलन...

मंथली विजयप्रताप जुलै २०२५ अंक

परिवहन मंत्री सरनाईक दररोजचा क्याश किती होते ते महामंडळाच्या डयाश बोर्डवर प्रकाशित करा ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर करिता बस आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली

मुंबई , दि. ११ : आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी   परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली   आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे , अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर   येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.   मंत्री श्री. सरनाईक म्हणाले , विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूर ला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधाव...