शिवाजी विद्यापीठामध्ये आयोजित 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' मेळाव्यास उत्तम प्रतिसाद
कोल्हापूर, दि.21 सप्टेंबर - महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्र,
कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील गणित अधिविभागाच्या
रामानुजन सभागृहामध्ये 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या
प्रशिक्षणार्थी भरती मेळाव्याच्या मुलाखतीसाठी विविध पदांकरिता पदवी, पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा, बारावी,
आयटीआय धारक उमेदवार मोठया संख्येने उपस्थित होते. मेळाव्यास दोनशेहून अधिक उपस्थित उमेदवारांच्या
शैक्षणिक कागदपत्रांच्या छाननीनंतर पात्रताधारक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पात्र प्रशिक्षणार्थी
उमेदवारांची लवकरच नेमणूक करण्यात येईल. पात्रताधारक उमेदवारांना शासनाच्या प्रशिक्षण योजना
कालावधीमध्ये विद्यावेतन दिले जाणार आहे.
-----
