Skip to main content

निसर्गरम्य शिवाजी विद्यापीठाचा शिक्षणाच्या बाबतीत आयचा घो .....शिवाजी विद्यापीठ शिक्षणातूनच होत आहे हाय.....ड ....


  




निसर्गरम्य शिवाजी विद्यापीठाचा  शिक्षणाच्या बाबतीत आयचा घो .....शिवाजी विद्यापीठ शिक्षणातूनच होत आहे हाय.....ड ....

शिवाजी विद्यापीठाने  ‘हाय-टेक’ होण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावलं उचलली पण  विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवीच्या आणि संशोधक विद्यर्थ्यांना   स्वच्छ वसतिगृह  , मेस ,सुसज्ज  ग्रंथालय, सुसज्ज अभ्यास केंद्र , सुसज्ज प्रयोगशाळा  इत्यादीची सोय नाही तर ,काही  विभागात विभाग प्रमुख आणि तज्ञ प्राध्यापक नाहीत , विभागात अभ्यास  तासिका होत नाहीत , अभ्यास केंदार्त अभ्यास साहित्याचा अभाव आणि कर्मचार्या अभावी वेळेत कपात ,संशोधकानाही आवश्यक सोई उपलब्ध नाहीत प्राध्यापकांना निवासाच्या सोई उपलब्ध आहेत पण निवासा भोवती नको असलेला गवत झाडपाला झुडपे आणि सर्प्त्नार्या प्राण्यांनी वेढलेला तर मग सांगा प्राध्यापकांची मानसिकता आणि आरोग्य कसे चांगले राहणार आणि कसा होणार विद्यार्थ्यांचा आणि विद्यापीठाचा विकास केवळ आम्ही हायटेक होत आहोत हे सांगू नये जबाबदार  कुलगुरुनी .विद्यापीठाच्या विद्यार्थ्यासाठी विद्यापीठाची मेस सुरु करावी , वसतिगृह फी कमी करावी आरोग्याच्या सोई अद्ययावत कराव्यात , विद्यापीठाची स्वतःची रुग्ण वाहिका असावी , विद्यापीठाच्या विद्यार्थ्या  साठी विद्यापीठाची बसे सेवा असावी , विद्यापीठाच्या विद्यार्थ्यासाठी ल्याप् टोप शासनाच्या न्द्तीने देण्यात यावा तरच विद्यापीठ सध्याच्या युगात शिवाजी विद्यापीठाची प्रतिमा निर्माण करू शकेल ...

शिवाजी विद्यापीठ सध्याच्या ग्लोबलायझेशनच्या युगात शिवाजी विद्यापीठाचीही प्रतिमा ‘हाय-टेक’ होण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावलं उचलण्यात येत आहेत. पण यामध्ये ‘आयसीटी’ बेस्ड कार्यप्रणालीचा अंगिकार आणि वापराला मोठं प्राधान्य राहिल. माहिती तंत्रज्ञानाचा सर्वंकष वापर करून घेण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या संगणक केंद्रात अद्ययावत स्वरुपाच्या डेटा सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. कॅम्पस नेटवर्किंगचं काम पूर्ण झालं आहे.

 ‘नॅशनल नॉलेज नेटवर्क’शीही विद्यापीठ आणि 170 संलग्नित महाविद्यालये जोडलेली आहेत. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या वापराला अधिकाधिक प्राधान्य देऊन सर्वच संबंधित घटकांचा अमूल्य वेळ वाचविण्याचाही विद्यापीठाचा प्रयत्न आहे. विद्यापीठाच्या 16 अधिविभागात स्मार्ट क्लासरुमचा उपक्रमही यशस्वीपणे कार्यान्वित झाला आहे. त्यासाठी विविध ठिकाणी क्लासरुममध्ये स्मार्ट-बोर्ड बसविले आहेत.

 ग्रंथालयामध्ये युजीसी-इन्फोनेट प्रकल्पांतर्गत ‘ई-जर्नल’च्या वापरासही मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) पर्स (प्रमोशन ऑफ युनिव्हर्सिटी रिसर्च ॲन्ड सायंटिफिक एक्सलन्स) या योजनेअंतर्गत विद्यापीठाला नऊ कोटी रुपयाचं अनुदान मंजूर झालं असून त्यातले तीन कोटी रुपये आतापर्यंत मिळाले आहेत. विद्यापीठाच्या विविध विभागांत सन 1962 पासून मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांचं संगणकीकृत माहितीमध्ये रुपांतरण करण्याचा प्रकल्प पूर्ण झाला आहे.

 विद्यापीठाच्या अधिविभागांना दिलेली शैक्षणिक स्वायत्तता आणि त्यांचे सक्षमीकरण या मोहिमेमुळे विभागांचा शैक्षणिक दर्जा आणि प्राध्यापकांच्या संशोधनाचा दर्जाही उंचावला आहे. परिणामी, विद्यापीठास विविध शिखर संस्थांकडून भरघोस निधी प्राप्त होत आहे. विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल सातत्याने विहित वेळेत जाहीर करणे आणि सर्व परीक्षांचे उत्तम नियोजन याबद्दल कुलपती महोदय आणि राज्य शासन यांनीही वेळोवेळी कौतुक केलं आहे.

 विद्यापीठाचा हाच लौकिक कायम ठेवण्यासाठी आणि परीक्षाविषयक सेवासुविधांचा आधुनिक पद्धतीने लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या (एमकेसीएल) सहाय्यानं डिजिटल युनिव्हर्सिटी डिजिटल कॉलेज (डीयुडीसी) ही संकल्पना यशस्वीपणे राबविली जात आहे. या योजनेत 13 अभ्यासक्रमांचा समावेश असून सद्यस्थितीत 271 महाविद्यालये आणि सुमारे दीड लाख विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेत आहेत.

 सलग दोन वर्षे या माध्यमातून यशस्वीपणे परीक्षा घेण्यात आल्या. यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. नियुक्ती विभाग, प्रश्नपत्रिका वितरण विभाग, मोबाईल स्टोरेज यंत्रणा आणि परीक्षा विभागात क्लोज सर्किट कॅमेरा यंत्रणा कार्यान्वित झाल्यानं सुरक्षा पद्धतीतही लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे.

 लेखा विभागाच्या कामकाजात सुधारणा व एकसूत्रता आणण्यासाठी विद्यापीठानं सन 2008मध्ये तयार केलेली लेखा संहिता किरकोळ फेरफारांसह एप्रिल 2012 पासून महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठांना लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या वित्त अधिकाऱ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या संगणक प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी भेट दिली होती आणि त्याअनुषंगाने ही प्रणाली एस.एन.डी.टी. विद्यापीठात लागू करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती त्यांच्या कुलगुरूंनी आपल्याला केली. आपण त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्या दृष्टीनं आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

 तसेच हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाच्या कुलगुरूंनीही त्यांच्या सहकाऱ्यांसह विद्यापीठास भेट देऊन या संगणक प्रणालीची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना सर्व सुविधा एकत्रित उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं विद्यार्थी सुविधा केंद्र (स्टुडंट फॅसिलिटी सेंटर) सुरू करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणं सुवर्णमहोत्सवी वर्षांचं औचित्य साधून सुवर्णमहोत्सवी अभ्यासिका, सुवर्णमहोत्सवी 'कमवा आणि शिका' मुलींचे वसतिगृह आणि संशोधक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह अशा विद्यार्थीकेंद्रीत उपक्रमांचाही प्रारंभ करण्यात येत आहे. अशा प्रकारे नाविन्याचा शोध आणि भविष्याचा वेध घेणारे विद्यार्थीकेंद्रित उपक्रम राबविण्यास विद्यापीठानं प्राधान्य दिलं आहे.

 ही पायाभरणीच विद्यापीठाच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी उपयुक्त सिद्ध होणार आहे. यशवंतराव चव्हाण रुरल डेव्हलपमेंट स्कूलची स्थापना विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक पाठबळाच्या सहाय्याने यशवंतराव चव्हाण रुरल डेव्हलपमेंट स्कूल हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम शिवाजी विद्यापीठ सुरू करीत आहे. या स्कूलच्या संकुलासाठी शासनाने 10 कोटींचा निधी मंजूर केला आहे. याअंतर्गत एम.टेक.

 (ग्रामीण तंत्रज्ञान), एमबीए (ग्रामीण व्यवस्थापन), एमआरएस (ग्रामीण अभ्यास), एमसीए (ग्रामीण माहिती तंत्रज्ञान) व एमएसडब्ल्यू (ग्रामीण समुदाय विकास) या पाठ्यक्रमास शासनाने मंजुरी दिली असून स्थानिक उद्योजक, बँकर्स, स्वयंसेवी संस्था यांच्याशी चर्चेतून त्यांना आवश्यक मनुष्यबळ निर्मिती डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय विचारांचा आणि त्यांच्या सद्यकालीन औचित्याचा अभ्यास करण्यासाठी यशवंतराव चव्हाण अध्यासनाची निर्मितीही या स्कूल अंतर्गत केलेली आहे. 


Popular posts from this blog

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर येथे 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

   पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार विजय देशमुख, आमदार रणजीत मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सह संचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते. उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढावी यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे , असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलन...

मंथली विजयप्रताप जुलै २०२५ अंक

परिवहन मंत्री सरनाईक दररोजचा क्याश किती होते ते महामंडळाच्या डयाश बोर्डवर प्रकाशित करा ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर करिता बस आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली

मुंबई , दि. ११ : आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी   परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली   आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे , अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर   येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.   मंत्री श्री. सरनाईक म्हणाले , विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूर ला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधाव...