Skip to main content

प्रारंभिक शिक्षण: परिवर्तनाची दिशा” या विषयावर राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन

प्रारंभिक शिक्षण: परिवर्तनाची दिशा” या विषयावर राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन

कोल्हापूर, दि. २१ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठात येत्या २६ व २७ सप्टेंबर रोजी प्रारंभिक शिक्षण: परिवर्तनाची दिशा” या विषयावर दोनदिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात हा परिसंवाद होईल. ही माहिती डॉ. चेतना सोनकांबळे आणि डॉ. रामचंद्र पवार यांनी दिली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यामध्ये वय वर्षे ३ ते ८ हा वयोगट प्रारंभिक शिक्षणाचा वयोगट म्हणून निश्चित केलेला आहे. हे वय आता शासनाने अधिकृतरित्या औपचारिक शिक्षणाच्या चौकटीत अंतर्भूत केलेले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील प्रारंभिक शिक्षणातील मुलभूत तरतुदी, आणि दृष्टिकोन शिक्षक - पालकांनी जाणून घेणे गरजेचे आहे. भाषा शिक्षण, गणित शिक्षण, कला शिक्षण या प्राथमिक शिक्षणातील प्रमुख विषयांच्या अध्ययन शास्त्रात सुरु असलेल्या नव्या संशोधनाचे शिक्षकांसोबत आदान - प्रदान होणे देखील महत्वाचे आहे. शिवाय बदलत्या जगातील तंत्रज्ञान, स्पर्धा, मानसिक संगोपन या मुद्द्यांच्या अनुषंगाने नव्या पिढीच्या शिकण्या - शिकवण्यातील आव्हानांचा वेध घेणेही गरजेचे आहे. याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेण्यासाठी आणि त्यावर विस्तृत चर्चा घडवून आणण्यासाठी, शिवाजी विद्यापीठाचा शिक्षणशास्त्र अधिविभाग, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि सृजन आनंद विद्यालय, बुनियादी शिक्षण केंद्र संचालित फुलोरा बालवाडी आणि श्रीमती लीला बापूसाहेब पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष परिसंवाद आयोजित केला आहे. 
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते परिसंवादाचे उद्घाटन होईल. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची विशेष उपस्थिती असेल. उदघाटनप्रसंगी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) चे संस्थापक डॉ. विवेक सावंत यांची प्रमुख उपस्थिती असून त्यांचे ‘तंत्रज्ञानाचा शिक्षणातील विवेकी’ वापर या विषयावर विशेष व्याख्यान होईल. 
पुणे येथील एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या प्रा. नलिनी पाटील, ‘नवीन शैक्षणिक धोरणा’विषयी मांडणी करतील. दोन दिवसीय परिसंवादात गणिताविषयी निलेश निमकर, भाषेविषयी मानसी महाजन, कलेविषयी आभा भागवत, मानसिक आरोग्यासंदर्भात देवव्रत हर्षे हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. 

यावेळी सृजन आनंद विद्यालयाच्या शिक्षकांनी लिहिलेल्या ‘घाट - शिकण्या-शिकवण्याचा’ व फुलोरा बालवाडीच्या शिक्षकांनी लिहिलेल्या ‘फुलोरा फुलताना’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. या परिसंवादाला शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर येथे 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

   पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार विजय देशमुख, आमदार रणजीत मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सह संचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते. उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढावी यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे , असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलन...

मंथली विजयप्रताप जुलै २०२५ अंक

परिवहन मंत्री सरनाईक दररोजचा क्याश किती होते ते महामंडळाच्या डयाश बोर्डवर प्रकाशित करा ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर करिता बस आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली

मुंबई , दि. ११ : आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी   परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली   आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे , अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर   येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.   मंत्री श्री. सरनाईक म्हणाले , विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूर ला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधाव...