Skip to main content

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीत महापालिकेच्या मानाच्या गाडीचे तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीत महापालिकेच्या मानाच्या गाडीचे तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले


 सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीच्या अनुषंगाने आजडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीत महापालिकेच्या मानाच्या गाडीचे तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, राजाभाऊ सरवदे, राजाभाऊ इंगळे,माजी गटनेते आनंद चंदनशिवे, सुभानजी बनसोडे, माजी नगरसेवक गणेश पुजारी,एड. संजीव सदाफुले, उत्सव समितीचे अध्यक्ष पृथ्वीजीत सरवदे , कार्याध्यक्ष डॉ. सायली शेंडगे, राजा कदम, राजा धावणे, सुग्रीव जेटीथोर , नागेश रणखांबे, मध्यवर्ती उत्सव समितीचे अध्यक्ष विकी शेंडगे, रॉकी बंगाळे यांच्यासह दोन्ही मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर येथे 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

   पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार विजय देशमुख, आमदार रणजीत मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सह संचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते. उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढावी यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे , असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलन...

मंथली विजयप्रताप जुलै २०२५ अंक

परिवहन मंत्री सरनाईक दररोजचा क्याश किती होते ते महामंडळाच्या डयाश बोर्डवर प्रकाशित करा ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर करिता बस आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली

मुंबई , दि. ११ : आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी   परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली   आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे , अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर   येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.   मंत्री श्री. सरनाईक म्हणाले , विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूर ला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधाव...