उद्धव ठाकरे आणि फडणवीस ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ कार्यक्रमासाठी आपले योगदान काय ?
उद्धव ठाकरे आणि फडणवीस ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ कार्यक्रमासाठी आपले योगदान काय ?
उद्धव ठाकरे
आणि फडणवीस ‘हिंदूहृदयसम्राट
बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर
बसस्थानक अभियान’
कार्यक्रमासाठी आपले योगदान काय ?
उपमुख्य
मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक
अभियान’
जरूर राबवा या अभियाना मध्ये राष्ट्री सेवा योजनेचा आणि समाजातील स्वयंसेवी
संस्थाचा सहभाग गेत्ल्यास अभिया अधिक प्रभाव शाली होईल आणि एस टी च्या प्रशासन आणि
व्यवस्थापन अधिकारी आणि र्निग स्टाफ यांचा समावेशा मुळे एस टी च्या प्रवासी सेवेत
आणि एकदर एस टी कामकाजावर परिणाम होणार नाही हे लक्षात ठेऊन अभियान राबवावे
‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक
अभियान’ च मुल्यांकन सुरु
मुल्यांकन करणार मंडळाचेच कर्मचारी ,पत्रकार आणि प्रवासी स्घ्त्नेचे पदाधिकारी पाहूया राज्याचे प्रथम क्रमांकाचे
१ कोटीचे बक्षीस कोण मिळवते त एकूण ३ कोटींची बक्षिसे – परिवहन मंत्री प्रताप
सरनाईक
मुंबई,: स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या
जयंतीनिमित्त २३ जानेवारी २०२५ रोजी पुढील
वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
संकल्पनेतून ” हिंदुहृदय
सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान ” राबवण्यात येणार आहे. तब्बल ३ कोटी रुपयांची बक्षिसे या
अभियानांतर्गत देण्यात येणार असून राज्यात ‘ अ ‘ वर्गात
पहिला येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात येत आहे, अशी घोषणा परिवहन
मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या अभियानाचा शुभारंभ २३ जानेवारी रोजी
मंत्री श्री. सरनाईक यांच्याहस्ते कुर्ला नेहरूनगर बसस्थानकावर सकाळी ११ वाजता
होणार आहे. यानिमित्ताने सर्व राज्यभर प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था व
एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
मागील वर्षी
हे अभियान सुरू करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाची संकल्पना
विषद करताना, सर्वसामान्य
प्रवाशांना स्वच्छ व सुंदर बसस्थानक तसेच निर्जंतूक , टापटीप प्रसाधनगृहे
कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे हे एस. टी. महामंडळाचे प्रथम कर्तव्य आहे. या
जाणिवेतून हे अभियान सुरू करण्यात येत आहे, असे स्पष्ट केले होते.
तसेच ” आपलं गाव, आपलं बसस्थानक ” या संकल्पनेवर आधारित
लोकसहभागातून बसस्थानकांचा सर्वांगीण विकास करणे हा या अभियानाचा मुख्य ” गाभा ” राहणार आहे. हे देखील
आवर्जून सांगितले होते. अर्थात, कोणतेही बसस्थानक हे त्या गावचे मध्यवर्ती ठिकाण असते. त्याअर्थाने
बसस्थानक हे त्या गावची ” शान
” असल्यामुळे
गावातील तरुण मंडळे, महिला
बचत गट, विविध
सामाजिक संस्था, उद्योग
समूह यांनी पुढे येऊन त्या बसस्थानकाचे सुशोभीकरण आणि सौंदर्यींकरणासाठी मदत करावी, असे आवाहन मंत्री
श्री. सरनाईक यांनी केले आहे.
