Skip to main content

ढोर समाज देशव्यापी मेळाव्यात नवे शिक्षण धोरण, आरक्षण वर्गीकरणावर चर्चा , कक्कय्या आर्थिक विकास महामंडळासाठी प्रयत्न सुरू - सुशीलकुमार शिंदे

  


ढोर समाज देशव्यापी मेळाव्यात नवे शिक्षण धोरण, आरक्षण वर्गीकरणावर चर्चा , कक्कय्या आर्थिक विकास महामंडळासाठी प्रयत्न सुरू - सुशीलकुमार शिंदे

सोलापूर, (प्रतिनिधी)ः-  मागासवर्गीय गटात ढोर समाज संख्येने कमी असला तरी आर्थिक विकास महामंडळाची गरज आहे आणि त्यासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करून कक्कय्या आर्थिक विकास महामंडळासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. ढोर समाजाच्या देशव्यापी मेळावा रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, धर्माजी सोनकवडे, गुरूमाता, राजेश खंदारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

         समाजाचा विकास करायचा असेल तर मी समाजासाठी काय योगदान दिले आहे याचे आत्मचिंतन करून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. पुर्वीच्या लोकांनी काय केले त्यापेक्षा यापुढे काय करायचे आहे यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आपला समाज लोकशाही मानणारा आहे. आम्ही मूठभर असलो तरी सुशिक्षित आहोत. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात संघर्ष केला पाहिजे तरच यश प्राप्त होते कोणत्याही कामाला लाज वाटू देवू नका असेही सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. आरक्षण वर्गीकरणामुळे समाजावर काय परिणाम होणार आहे हे पुढील काळात समजेल परंतु आपण आपल्या पुढच्या पिढीला चांगले शिक्षण देवून सक्षम केले पाहिजे असेही शिंदे यांनी सांगितले.

        प्रत्येकाला जातीचा अभिमान असला पाहिजे आणि प्रत्येकाने समाजासाठी काम केले पाहिजे समाजातील मुलींना चांगले शिक्षण दिले पाहिजे असे आपल्या मनोगतामधून माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांनी व्यक्त केले.

       समाजाच्या विकासासाठी मी कायम सोबत राहणार आहे अनेक अडचणी आहेत आरक्षणामध्ये इतर जाती घुसल्यामुळे आपल्या समाजावर अन्याय होत आहे संघर्ष करावा लागणार आहे त्यासाठी प्रत्येकाने तयारी ठेवली पाहिजे असे प्रतिपादन माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले.

       प्रारंभी या मेळाव्याचे संयोजक लक्ष्मीदास सोनकवडे यांनी प्रास्ताविक करीत समाजात अंतर्गत जनगणना केली तर आपण किती आहोत याची संख्या कळेल त्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे सर्वांनी सहकार्य करावे. समाजातील सक्षम असलेल्यांनी मागे राहिलेल्या समाजबांधवाना मदतीचा हाथ दिला पाहीजे ज्यांच्याकडे आहे त्यांनी ज्यांच्याकडे नाही अशा लोकांना मदत केली तर समाज सुधारणा व्हायला वेळ लागणार नाही असे त्यांनी सांगितले. दिपप्रज्वलन आणि संत कक्कय्या, शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आदी राज्यातून आलेल्या अनेक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर देशभरात समाजाचे नावलौकीक वाढवणार्‍या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रविण होटकर आणि वनिता होटकर यांनी केले तर आभार सटवाजी होटकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी सुधीर खरटकमल, मुन्ना कटके, सच्चिदानंद होटकर, अशोक सदाफुले, रविंद्र शिंदे, संगीता जोगधनकर, शारदा शिंदे, अ‍ॅड विद्या कटकधोंड, राजेश कटकधोंड,विनोद होटकर,नित्यानंद सोनकवडे, विनायक होटकर, गणेश शिंदे यांच्यासह अनेकांनी विशेष परिश्रम घेतले. दिवसभर हुतात्मा स्मृती मंदिरात झालेल्या या मेळाव्यासाठी ढोर समाजबांधवांनी मोठ्यासंख्येने गर्दी केली होती.

 


Popular posts from this blog

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर येथे 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

   पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार विजय देशमुख, आमदार रणजीत मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सह संचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते. उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढावी यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे , असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलन...

मंथली विजयप्रताप जुलै २०२५ अंक

परिवहन मंत्री सरनाईक दररोजचा क्याश किती होते ते महामंडळाच्या डयाश बोर्डवर प्रकाशित करा ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर करिता बस आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली

मुंबई , दि. ११ : आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी   परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली   आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे , अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर   येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.   मंत्री श्री. सरनाईक म्हणाले , विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूर ला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधाव...