Skip to main content

सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील

 


सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील

सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात होणारा पाणीपुरवठ्याचा दुजाभाव थांबवावा व असमतोल अन्यायकारक पाणीपुरवठा प्रश्नी पालकमंत्री यांनी तात्काळ लक्ष घालून संपूर्ण शहराला समान दिवसाड, नियमित, सुरळीत, एकसमान पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी अ़ॅड. मनीश गडदे पाटील यांनी केली आहे.

     सोलापूर शहरातील पाणीपुरवठा करिता समांतर जलवाहिनीचे काम अनेक नैसर्गिक, सरकारी अडथळ्यांची संकटे पार करीत एकदाची पूर्ण झाली आणि नुकतीच पाकणी/सोरेगाव येथील जलकेंद्रात पाणी पोहचले याचा मनस्वी आनंद झाला. यावर्षी निसर्गाच्या कृपेने जून महिन्यात उजनी जलसाठा 73% झाला ही सुद्धा जमेची बाजू आहे.

 

    सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेला पाणीपुरवठा शहराच्या काही विशिष्ट भागात चार ४दिवसाड आणि उर्वरित भागात पाच ५दिवसाड असा करण्यात येत आहे. आता तर तीन ३दिवसाड करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु शहरातील रहिवासी कुटुंबीयावर आजरोजी असमतोल पद्धतीने पाणीपुरवठा करून सोमपा अन्याय करत आहे अशी लोकभावना होत आहे. यामध्ये पाच ५दिवसाड पाणीपुरवठा हा हद्दवाढ भाग, झोपड़पट्टी गुंठेवारी ठिकाणी होत असल्याची नागरिकांची चर्चा आहे. खरंतर असे असेल तर ही बाब अतिशय क्लेशदायक असे आम्हाला वाटते.

   सोमपाच्या अखत्यारीतील संपूर्ण शहर व येथील सर्व नागरिक रहिवासी जनता ही सोमपा करीता संविधानानुसार समान आहे परंतु सोमपा प्रशासन सर्वांना समान पाणीपट्टी घेऊन सुद्धा पाणीपुरवठ्यात मात्र दुजाभाव करत आहे. शासन प्रशासन जनतेच्या प्रति असलेल्या समतेच्या तत्वांचे उल्लंघन करून घटनात्मक तरतुदींची पायमल्ली करत आहे अशी शंका वाटते. या सोमपाच्या अत्यंत गंभीर बाबीकडे 'पालकमंत्री' यांचे लक्ष वेधू इच्छितो.

   महोदय, शहराचा पाणीपुरवठा सर्व भागात एकसमान पद्धतीने व एकसमान दिवसाड झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. हा सोलापूरच्या सोशिक, सहनशील जनतेवर होणारा सरकारी अन्याय आपण गंभीर्याने नोंद घेऊन 'पालक' या नात्याने दूर करावा हीच आग्रही विनंती अन्यथा नाईलाजास्तव सामान्य सोलापूरकरांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने काँग्रेस पक्षाला व्यापक जनआंदोलन उभारावे लागेल याची नम्र नोंद घ्यावी. असा इशारा देण्यात आला आहे.

                     

 

 

 

 

 


Popular posts from this blog

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर येथे 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

   पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार विजय देशमुख, आमदार रणजीत मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सह संचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते. उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढावी यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे , असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलन...

मंथली विजयप्रताप जुलै २०२५ अंक

परिवहन मंत्री सरनाईक दररोजचा क्याश किती होते ते महामंडळाच्या डयाश बोर्डवर प्रकाशित करा ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर करिता बस आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली

मुंबई , दि. ११ : आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी   परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली   आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे , अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर   येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.   मंत्री श्री. सरनाईक म्हणाले , विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूर ला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधाव...